उल्हास नदी पाणी साठय़ाच्या नियोजनाकरीता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणी पुरवठा कंपनी येत्या मंगळवारी शटडाऊन घेणार आहे. या दिवशी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.  १८ डिसेंबर सकाळी ९ ते बुधवार, १९ डिसेंबर सकाळी ९ या कालावधीत स्टेम पाणी पुरवठा कंपनी शटडाऊन घेणार असल्याने या कालावधीत घोडबंदर रोड, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, खारटन रोड या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच या शटडाऊनमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पालिकेने कळविले आहे.