डोंबिवली पूर्वेला असलेल्या खंबाळपाडा परिसरात संध्याकाळी चारच्या सुमारास मेनहोलमध्ये पडून तिघांचा मृत्यू झाला. चंद्रभान पाचगे, महादेव धोंडीराम झोपे आणि चंद्रभान अशी या तिघांची नावं आहेत अशी माहिती समोर आली आहे. या तिघांचेही मृतदेह अग्निशमन दलाने बाहेर काढले आहेत. हे तिघेही कंत्राटी कामगार असल्याची माहिती समजते आहे.मेनहोल साफ करण्यासाठी हे तिघे मेनहोलमध्ये उतरले होते. याप्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे असेही समजते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three contract workers die in dombivli manhole
First published on: 26-10-2018 at 17:26 IST