scorecardresearch

Premium

खारेगावजवळ अपघातात तीन ठार

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव परिसरात बुधवारी पहाटे कारने टँकरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव परिसरात बुधवारी पहाटे कारने टँकरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी टँकरचालक मोहम्मद सलमान हमीदअली कुरेशी (२७, रा. चेंबूर) याला ताब्यात घेतले आहे.
विकी पिन्टो अमरोज (३४), कबीर अरोरा (२५) आणि अनुज दिघे (३२) अशी  मृत पावलेल्या तिघांची तर अजित परब (४०), असे जखमीचे नाव आहे. हे सर्वजण ठाणे परिसरातील रहिवासी असून कॉलसेंटरमध्ये कामाला होते. हे चौघेजण  एका कारमधून ठाण्याच्या दिशेने येत होते. खारेगाव टोलनाकापासून काही अंतरावर असलेल्या पुलाजवळ ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या टँकरला त्यांच्या कारची पाठीमागून जोरदार धडक बसली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three killed in kharegaon accident

First published on: 03-07-2014 at 04:02 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×