तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या हितेंद्र सिंग या आरोपीस कडक शिक्षा व्हावी आणि घटनेचा निषेघ करण्यासाठी कोपरी येथे नागरिकांनी मोर्चा काढला. दरम्यान आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेताना संतप्त महिलांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला, तसेच पोलिसांना घेरावही घातला.
आरोपी हितेंद्र सिंग (२३) एका वडापावच्या गाडीवर काम करतो. बुधवारी दुपारी त्याने कोपरी पुलाखाली  एका तीन वर्षीय मुलीवर अत्याचार केला. पोलिसांनी त्याला लगेचच अटक केली होती, पण संतप्त झालेल्या कोपरी येथील नागरिकांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध केला आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत असताना संतप्त महिलांनी चोप देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला दुसऱ्या बाजूने नेले. यामुळे अधिकच संतप्त झालेल्या महिलांनी पोलिसांना घेराव घातला. पोलिसांनी महिलांची समजूत घातल्यावर वातावरण शांत झाले.
दरम्यान, बलात्काराच्या या घटनेमुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चेंदणी कोळीवाडा आणि सिडको येथे परप्रांतीय फेरीवाल्यांना मारहाण करून हुसकावून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tried to beat to rapist in thane
First published on: 29-03-2013 at 02:49 IST