रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना मोटारसायकलवरून लुटणाऱ्या दोघांना जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली आहे. नदीम खान आणि परवेझ अख्तर अशी या दोघांची नावे आहेत. नदीमवर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात १३ गुन्ह्यांची नोंद आहे.
आरोपी नदीम आणि परवेझ हे दोघे धूम स्टाइलने चोरी करून मोटारसायकलीवरून पळून जात. नदीमला नालासोपारा येथून अटक करण्यात आली तर परवेझला मीरा रोड येथून अटक करण्यात आली.
मौजमजा करण्यासाठी ते हे गुन्हे करत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.