नवी मुंबई येथील बिल्डर सुनीलकुमार लोहारिया यांच्या हत्येप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने बिल्डर सुमीत बच्चेवार याला अटक केली आहे. बच्चेवार हा लोहारिया यांचा पूर्वी व्यावसायिक भागीदार होता. लोहारिया यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना प्रत्येकी दोन लाखांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
लोहारिया यांच्या हत्याप्रकरणातील ही चौथी अटक आहे. बच्चेवार हा लोहारिया यांचा व्यावसायिक भागीदार होता. १९९३ ते २००३ या काळात बच्चेवार रस्त्याचा ठेकेदार होता. भागीदारीत त्यांनी सिडकोची मोठी कामे केलेली होती. मात्र कुठल्यातरी कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल केल्या होत्या. त्याला ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान, लोहारिया यांच्या हत्येसाठी प्रत्येकी दोन लाखांची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाजिद कुरेशी हा अटकेत असलेला मारेकरी अमोलिक यांच्या परिचयाचा असल्यामुळे विनामूल्य काम करण्यास तयार झाला, असे पोलिसांनी सांगितले.