scorecardresearch

Premium

सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रत्येकी १६ जागा लढविण्याचा प्रस्ताव

काँग्रेसची १६ जागा स्वीकारण्यास तयारी नसल्याचे समजते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडानंतर शिवसेना व राष्ट्रवादी कमकुवत झाली आहे.

sharad pawar balasaheb thorat uddhav thackrey
सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रत्येकी १६ जागा लढविण्याचा प्रस्ताव

मुंबई : इंडिया आघाडीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शिवसेनेने त्यांच्या कोटय़ातून जागा सोडावी. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा सोडली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. राज्यातील जागावाटपाच्या सूत्रावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. याशिवाय काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधण्यात आला.

राज्यातील ४८ जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रत्येकी १६ जागा वाटून घ्याव्यात, असा प्रस्ताव चर्चेला आला. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेना १८, राष्ट्रवादी चार तर काँग्रेसचा एक खासदार निवडून आला होता. बदलत्या राजकीय परिस्थितीत तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा परस्परांमध्ये वाटून घ्याव्यात, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Ajit Pawar Baramati
अजित पवार का म्हणाले, “…तर राजकारणातील माझी किंमत कमी होईल”
caste supremacy
काँग्रेसच्या चेहऱ्यावरील जातवर्चस्वाचा ओरखडा पुसण्याचा प्रयत्न
An attempt by Ajit Pawar supporters to take over the NCP office near Dengle bridge pune
‘राष्ट्रवादी भवन’वरून दोन्ही गट आमने-सामने; अजित पवार गटाचा ताबा घेण्याचा प्रयत्न
sharmistha mukherje and Rahul Gandhi
“काँग्रेसने नेतृत्वाबाबत गांधी घराण्याच्या बाहेर…”, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींचं परखड मत

हेही वाचा >>> Maratha reservation: जरांगेंचे उपोषण सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची प्रतीक्षा

काँग्रेसची १६ जागा स्वीकारण्यास तयारी नसल्याचे समजते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडानंतर शिवसेना व राष्ट्रवादी कमकुवत झाली आहे. यामुळे या दोन्ही पक्षांना एवढय़ा जागा सोडण्यास काँग्रेसची तयारी नसल्याचे नेत्यांकडून सांगण्यात आले. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्यासाठी इंडिया आघाडी जागा सोडणार नाही. शिवसेना आणि वंचितची युती असल्याने शिवसेनेने त्यांच्या कोटय़ातून प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी जागा सोडावी, असे स्पष्ट करण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackrey shivesena congress ncp propose to contest 16 seats each ysh

First published on: 14-09-2023 at 01:11 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×