इस्टेट एजंट कडून तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला न्यायालयाने ६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हा गुन्हा दाऊदच्या सांगण्यावरून झालेला आहे का, त्याचाही पोलीस तपास करत आहेत.
इस्टेट एजंट सलीम शेख यांना ३० जानेवारी रोजी इक्बाल कासकर याने भेंडीबाजार येथील डांबरवाला इमारतीमधील आपल्या राहत्या घरात बोलावून घेतले होते. इस्टेट एजंटचा व्यवसाय करत असूनही एकदाही पैसे दिले नसल्याचे सांगत कासकरने त्याच्याकडे ३ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.