अंधेरी-विलेपार्लेदरम्यान झालेल्या अपघातानंतर पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक विस्कटले. मात्र या विस्कटलेल्या वेळापत्रकाचा विचित्र फटका मंगळवारी रात्री विलेपार्ले स्थानकाचे स्थानक अधीक्षक अशोक आझाद यांना बसला. बराच वेळ होऊनही गाडय़ा का येत नाहीत, असा जाब विचारत प्रवाशांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जगजीवनराम रुग्णालयात दाखल करण्यात आले.