मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी वातानुकूलित लोकलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार आणि आरामदायी व्हावा यासाठी येत्या महिन्यात ५० वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा >>> यंदा गणेशोत्सवात चार दिवस १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर, वर्षभरातील १३ दिवसांची यादी जाहीर

Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Loud advertisement
‘मोदी की गॅरंटी’च्या कर्णकर्कश जाहिरातीने रेल्वे प्रवासी हैराण
ticketless passengers mumbai
विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी ‘बॅटमॅन’ पथक सज्ज

भारतीय रेल्वेवर सर्वात पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ मध्ये पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट – बोरिवलीदरम्यान धावली. सुरुवातीला या लोकलला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, हळूहळू प्रवाशांनी या लोकलला पसंती दर्शवली. तिकीट दरात कपात केल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढू लागला. सध्या वातानुकूलित लोकलमध्ये गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवासी करू लागले आहेत.

हेही वाचा >>> पात्र ५८५ गिरणी कामगार अखेर हक्काच्या घरात, कोन पवनेलमधील घरांचे वितरण

पश्चिम रेल्वेवर सध्या ९६ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. या फेऱ्यांमध्ये दररोज सरासरी १.६२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. चालू आर्थिक वर्षात ३ कोटींहून अधिक प्रवाशांनी वातानुकूलित लोकलमधून प्रवास केला. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि उन्हाळ्यातील गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने आणखी पाच वातानुकूलित रेक आणण्याचे नियोजन आहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सध्या ७ वातानुकूलित रेक असून आणखी ५ वातानुकूलित रेक दाखल झाल्यास, ५० वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवणे शक्य होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यास प्रवास आणखी वेगवान आणि गारेगार होईल. तसेच या लोकलमध्ये तिकीट तपासणी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येईल.

– मयूर पवार, प्रवासी

मार्च २०२४ पर्यंत आणखी पाच वातानुकूलित रेक येणे अपेक्षित आहे. हे रेक मिळाल्यानंतर वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येतील.

– नीरज वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई सेंट्रल, पश्चिम रेल्वे