विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे संकुल जलतरण तलावात बुडून श्रेया भोसले (३८) या महिलेचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे जलतरण प्रशिक्षण शिबिरात ८०जणींसोबत ही महिला तरणतलावात उतरली होती आणि प्रशिक्षण संपून सर्वजणी बाहेर आल्यानंतर प्रशिक्षकांना नव्हे तर सफाई कर्मचाऱ्यांना त्या तलावात बुडालेल्या दिसल्या.  त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले. बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालाने स्पष्ट झाले. पोलिसांनी जलतरण तलावाचे प्रमुख आणि प्रशिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे, असे विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजीव चव्हाण यांनी सांगितले.
श्रेया यांच्या पतीचा चायनिज पदार्थाचा स्टॉल असून त्यांना एक मुलगा आहे. दोन दीर पोलीस दलात आहेत. दोनच महिन्यांपूर्वी घाटकोपर येथेही एका तरुणीचा तरणतलावात बुडून मृत्यू झाला होता.