मालाडच्या मालवणी येथील एका घरात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. परवीन शेख (२५) असे तिचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी तिची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.मालवणीच्या गेट क्रमांक ८ येथील आग्रा गल्लीत एका भाडय़ाच्या घरात परवीन शेख दोन महिन्यांपूर्वी राहण्यासाठी आली होती. ती पूर्वी बारबाला म्हणून काम होती. सध्या ती स्टेज शो आणि चित्रपटात एक्स्ट्रा कलाकार म्हणून काम करत होती. तिच्या घरातून दरुगधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा परवीन मृतावस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. तिच्या शरीरावर इतर जखमा नव्हत्या. परंतु किमान दोन दिवासांपूर्वी तिची गळा आवळून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.