जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदवरील उपचारांवरून मुंबईतील सैफी रुग्णालय प्रशासन आणि इमानच्या कुटुंबीयांमध्ये सुरु असलेला वाद चिघळला आहे. इमानच्या कुटुंबीयांनी आरोप केल्यानंतर नाराज झालेल्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आहे. इमानला रुग्णालयातून सोडण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ५०० किलो वजन असलेल्या इमानला यावर्षी ११ फेब्रुवारीला मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. इमानचे वजन १७१ किलोपर्यंत घटले असल्याचे सोमवारी डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र इमानच्या प्रकृतीत अद्यापही फारशी सुधारणा झाली नाही. ती बोलू शकत नाही आणि तिचे वजन घटल्याचा डॉक्टरांनी केलेला दावा खोटा आहे, असा आरोप इमानची बहिण शायमा सेलीम हिने केला होता. त्यानंतर डॉक्टरांनी नाराजी व्यक्त करत इमानवर उपचार करण्यास नकार दिला आहे. इमानला रुग्णालयातून सोडण्याचा निर्णयही रुग्णालयाने घेतला आहे.

इमानच्या कुटुंबीयांनी आरोप केल्यानंतर तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकातील डॉ. अपर्णा भास्कर यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. इमानच्या कुटुंबीयांनी आरोप केल्याने आम्ही दुखावलो आहोत, अशा शब्दांत डॉ. अपर्णा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या मुलांना सोडून आम्ही इमानसोबत अनेक दिवसांपासून राहिलो. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी आरोप केल्याने आम्ही कमालीचे निराश झालो आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. इमानचे वजन कमी झाले असून हा चमत्कारच म्हणावा लागेल. तिचे वजन कमी झाल्याचे आम्ही कागदोपत्री सिद्ध करू शकतो, असे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी सांगितले.

wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Babasaheb Ambedkar Research and Training Institute
बार्टीचे अधिकारी निघाले लंडनला! ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली वंचित विद्यार्थ्यांच्या पैशाचा…
ED seize property
सलग दुसऱ्या दिवशी विनोद खुटेच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच

तत्पूर्वी, इमानच्या प्रकृतीत अद्याप फारशी सुधारणा झालेली नाही. ती धड बोलूही शकत नाही. तसेच ती हालचालही करू शकत नाही. तिचे वजन कमी झाल्याचा डॉक्टर दावा करत आहेत. मात्र, तिचे वजन कमी झालेले नाही, असा आरोप इमानच्या बहिणीने केला आहे. मात्र, डॉक्टरांनी इमानच्या बहिणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. इमानचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी येथील डॉक्टरांनी सर्व प्रकारचे उपचार केले आहेत. तिचे वजनही घटले आहे. हा चमत्कारच म्हणावा लागेल. इमानचे वजन घटल्याचे आम्ही कागदपत्रांद्वारे सिद्ध करू, असेही डॉक्टरांनी सांगितले.