नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात साडेअकरा कोटी रुपयांची वाढ केली आहे. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीला १ हजार ९७५ कोटी ८५ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावरील चर्चेत जमा-खर्चाच्या बाजूत वाढ करत स्थायी समितीने १ हजार ९८६ कोटी ९० लाखांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.
सन २०१६-१७ करिता ७५ कोटी ६२ लाख रुपये आरंभीच्या शिलकेसह १ हजार ९७५ कोटी ८५ लाख जमा व १ हजार ९७५ कोटी ४० लाख खर्च आणि ४५ लाख ५४ हजार रुपये शिल्लक रकमेचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीत सादर केले होते.
त्यामध्ये स्थायी समितीने २०१६-१७ च्या मूळ अर्थसंकल्पात जमेच्या बाजूत परवाना विभाग १ कोटी ५० लाख, रस्ता खोदकाम १ कोटी ५० लाख, नगररचना ३ कोटी ५० लाख, मालमत्ता कर ५ कोटी खर्चाच्या बाजूत मोरबे धरणाची क्षमता वाढविणे ३ कोटी ५० लाख, घनकचरा व्यवस्थापनसाठी ७ कोटी, मौलाना अब्दुल कलामांचे स्मारकासाठी १ कोटीची वाढ केली आहे. २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक १ हजार ८४६ कोटी ५२ लाख रुपये सुधारित जमा व १ हजार ८४६ कोटी ५२ लाख अखेरच्या शिलकेसह सुधारित खर्च अपेक्षित धरला होता. यामध्ये जमेच्या बाजूत मालमत्ताकरात ८ कोटी व खर्चाच्या बाजूत घनकचरा व्यवस्थापनासाठी ८ कोटीची तरतूद स्थायी समितीने केली.