नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानात अवैधरित्या प्रवेश करणाऱ्या आठ जणांना अंबाझरी गस्ती पथक व राज्य राखीव पोलीस दलाने  अटक के ली.

शुक्र वारी दुपारी १२  या सुमारास अंबाझरी जैवविविधता उद्यानातील कक्ष क्र . ७९७ राखीव वनात आणि संरक्षण टॉवर क्र . दोन वाडी भागात अंबाझरी गस्ती पथकास काही इसम मासेमारीकरिता दाखल झाल्याची माहिती मिळाली. सध्या राज्य राखीव पोलीस दल गट क्र .  ४ यांची तुकडी गस्ती पथकासह अंबाझरी वनक्षेत्रात कार्यरत आहे.

माहिती मिळताच दोन्ही विभागाने तातडीने कारवाई केली. शैलेश मडावी, हेमलाल शाहू, जागेश्वर सहारे, अर्जून निसाद, महेंद्र भेडेकर, हंसलाल परधानिया हे सर्व श्रमिकनगरचे रहिवासी असून जितेंद्र वासनिक, सूरू बाविसताले हे आंबेडकरनगरातील रहिवासी आहेत. चौकशीदरम्यान ते मासेमारिकरिता अंबाझरी वनक्षेत्रात अवैध प्रवेश के ल्याचे स्पष्ट झाले. आरोपीकडून दोन मासेमारी करण्याचे जाळे जप्त करण्यात आले आहेत. भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६(१) ड नुसार वनगुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक एस.टी. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्र सहाय्यक पी.आर. बडोले, वनरक्षक एन.डी. तवले, विलास खापर्डे, वनकामगार ए.आर. वाणी, ए.एम. चौधरी तसेच सहाय्य पोलीस निरीक्षक आर.सी. राय यांच्या नेतृत्त्वात राज्य राखीव पोलीस दल गट क्र . चार यांची तुकडी यांनी केली.

अंबाझरी गस्ती पथक व राज्य राखीव पोलीस दल गट क्र . चार यांचे प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल यांनी कारवाई पथकाचे कौतुक के ले आहे.

मोहफु लासाठी जंगलाला आग

टाळेबंदीचा फायदा घेत मोहफु लासाठी कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील जंगलाला आग लावणाऱ्या लाडई गावातील तीन जणांवर वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाघ व इतर तृणभक्षक वन्यप्राण्यांच्या समृद्धीसाठी कळमेश्वर वनपरिक्षेत्र प्रसिद्ध  आहे.  मात्र, मोह गोळा करण्यासाठी लिंगा-लाडई गावाशेजारील संरक्षित वनातील कक्ष क्र . १९२ मध्ये गुरुवारी काही इसमांनी आग लावली.  या आगीत सुमारे ६.१० हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले. या घटनेबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकार यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सुनिल फु लझेले, सुनील फु लझेले, सुनील गाढवे यांनी चौकशी करुन  काशीराम सलाम, अजय मसराम व राहूल रामटेके  या तिघांविरुद्ध वनगुन्हा नोंदवण्यात आला.