डॉक्टरच्या विनयभंग प्रकरणातील फरारी

नागपूर : नौशाद टोळीशी जुळलेल्या कुख्यात पवन मोरयानी याला अखेर पाचपावली पोलिसांनी अटक केली. एका रुग्णालयातील महिला डॉक्टरचा विनयभंग केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्य़ात तो फरार होता.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Anthony Albanese
सिडनीतील हल्लेखोराची ओळख पटवण्यात यश
Rameshwaram Cafe Bomb Blast Case
रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सूत्रधारासह एकाला अटक; एनआयएची मोठी कारवाई

पाचपावलीतील एका रुग्णालयामध्ये पवनची आई उपचार घेत होती. तिला बघण्यासाठी तो ५ जानेवारीला रुग्णालयात गेला होता. त्यावेळी त्याने २४ वर्षीय महिला डॉक्टरशी वाद घातला. विनयभंग करून महिला डॉक्टरला ठार मारण्याची धमकी दिली. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी पवनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात व पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक मसराम, हवालदार संजय वानखेडे, शिपाई विनोद बरडे, जितेंद्र शर्मा यांचे पथक त्याचा शोध घेत होते. फरार असताना तो रायपूर, बिलासपूर व इंदूरमध्ये वास्तव्यास असल्याचे कळताच पोलिसांचे पथक तेथे गेले. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच तो पसार होत होता. पवनच्या मुलीची प्रकृती खालावली. तिला कोराडी मार्गावरील अ‍ॅलेक्सिस रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले. तो मुलीला भेटायला येणार असल्याची माहिती पाचपावलीचे पोलीस निरीक्षक मेश्राम यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह रुग्णालयाभोवती सापळा रचला. पवन तेथे येताच पोलिसांनी त्याला अटक केली.

पाचपावलीतील एका रुग्णालयामध्ये पवनची आई उपचार घेत होती. तिला बघण्यासाठी तो रुग्णालयात गेला होता. त्यावेळी त्याने महिला डॉक्टरशी वाद घातला.विनयभंग करून महिला डॉक्टरला ठार मारण्याची धमकी दिली होती.  यावेळी पवनच्या मुलीची प्रकृती खालावली. तिला अ‍ॅलेक्सिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तो मुलीला भेटायला येणार होता.

भाजपच्या नेत्याच्या दबावात हटवला ‘मोक्का’

पवन मोरयानी कमाल चौकातील साईनाथ अपार्टमेंटमध्ये हुक्का पार्लर चालवायचा. डिसेंबर २०१७ मध्ये त्यावर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी कुख्यात नौशादसह, इप्पा ,पवन व त्याच्या साथीदारांनी डोबीनगरमध्ये पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणात नौशाद,  इप्पा, पवनसह त्याच्यासाथीदारांविरुद्ध प्राणघातक हल्लय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात ‘मोक्का’अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. पण, उत्तर नागपुरातील भाजपच्या एका नेत्याने पोलिसांवर दबाव टाकून पवनविरुद्धचा मोक्का हटवायला लावला होता.