News Flash

श्वास नलिकेत फुगा अडकून ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

फुगा फुगवत असतानाच सानिध्यने तो चुकून तो गिळला.

संग्रहित छायाचित्र

फुगा श्वसननलिकेत अडकून एका सहावर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूर येथे घडली आहे. सानिध्य आनंद उरकुडे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. खेळता-खेळताच सानिध्यचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि. २५ जानेवारी रोजी रात्री घडली.

अधिक माहिती अशी, सानिध्य हा शुक्रवारी (दि. २५) रात्री आपल्या घरासमोर खेळत होता. त्याच्याकडे एक फुगा होता. फुगा फुगवत असतानाच सानिध्यने तो चुकून तो गिळला. तो फुगा त्याच्या श्वासनलिकेत जाऊन अडकला.

फुगा गिळल्याने त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला व तो रडू लागला. त्याच्या आई-वडिलांनी त्याला त्वरीत डॉक्टरांकडे नेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर नागपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2019 10:51 am

Web Title: in nagpur 6 years child death balloon in respiratory tract
Next Stories
1 उपचारासाठी आता कुणालाही वंचित रहावे लागणार नाही
2 वादळी पावसाने विदर्भाला झोडपले
3 नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवणाऱ्या दोघांना नागपुरातून अटक
Just Now!
X