Marksheet Discrepancy in Gujarat: परिक्षेत पेपरमध्ये जशा विद्यार्थ्यांकडून चुका होतात तशाच चुका शिक्षकांकडूनही पेपर तपासताना होतात का? असं झालं तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर होईल. मात्र असंच एक प्रकरण गुजरातमधून समोर आलं आहे. यामध्ये प्राथमिक शाळेच्या निकालात मास्तरांचा प्रताप पाहायला मिळाला आहे. गुजरात राज्यातील दाहोद जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळेतील वार्षिक परिक्षा निकालात झालेल्या त्रुटींमुळे वाद निर्माण झाला असून शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वंशीबेन मनीषभाई या चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिची गुणपत्रिका मिळाली तेव्हा केवळ विद्यार्थिनीच नव्हे तर तिच्या मित्र-मैत्रिणींसह कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण, शाळेतील ढिसाळ कारभाराचा प्रताप म्हणून विद्यार्थिनिला भाषा विषयात चक्क २०० पैकी २११ गुण आणि गणित विषयातही २०० पैकी २१२ गुण प्राप्त झाले होते. घडला प्रकार लक्षात येताच विद्यार्थी गोंधळून तर शाळा प्रशासन भांबावून गेले. गुजरातमधील शालेय विभागाच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीची पावती असणारे हे गुणपत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

नेमकं घडलं काय?

It is necessary to keep developing the skills in oneself Dr Apoorva Palkar
स्वत:मधील कौशल्ये विकसित करत राहणे गरजेचे- डॉ. अपूर्वा पालकर
Loksatta explained Why do students oppose the new foreign scholarship policy
विश्लेषण: परदेशी शिष्यवृत्तीच्या नवीन धोरणाला बहुजन विद्यार्थ्यांचा विरोध का?
Low response, students, admission,
अकरावी प्रवेशप्रक्रियेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद; यंदा किती विद्यार्थ्यांची नोंदणी?
IIM Amritsar Student Protest
विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या मेसमध्ये झोपून केलं अनोखं आंदोलन; Video सोशल मीडियावर व्हायरल
Difficulties in getting jobs for M Com students of Mumbai University Mumbai
सहा महिन्यांनंतरही गुणपत्रिकेची प्रतीक्षा; मुंबई विद्यापीठाच्या ‘एम.कॉम.’च्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवताना अडचणी
coaching classes get more students admission through agent in latur
शिकवणी वर्ग परिसरात दलालांचा वावर; लातूरमध्ये प्राध्यापकांच्या फोडाफोडीसाठी कमिशन,अधिकाधिक विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न
MHT CET Result Dates, MHT CET Result Dates Creates Uncertainty Confusion, MHT CET Result Dates Confusion in Students, engineering cet, agriculture cet, pharmacy cet, education news,
एमएचटी सीईटीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, निकाल जाहीर करण्यास विलंब
NEET 2024 controvercy Why is there a controversy around NEET this year
नीट परीक्षेच्या निकालावरुन रणकंदन; नेमके काय घोळ झालेत?

उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन १०० टक्के बिनचूक होणे आवश्‍यक आहे. मंडळाची विश्‍वासार्हता त्यामुळे पणाला लागते. गुजरातमधील वंशीबेन मनीषभाई या चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तिची गुणपत्रिका काळजीपूर्वक तपासली असता तिला त्यात ही गंभीर चूक आढळून आली. त्यामुळे तीने ती तिच्या पालकांना दाखवली आणि घडलेली चूक शिक्षकांच्याही निदर्शानास आणून दिली. ज्यामध्ये तिला गुजराती भाषा या विषयात २०० पैकी २११ गुण आणि गणित विषयातही २०० पैकी २१२ गुण मिळाले.

शालेय प्रशासनाने सुधारली चूक

त्यानंतर शालेय प्रशासनाची एकच धावपळ उडाली. त्रुटी लक्षात आल्यानंतर शालेय प्रशासनाने ती दुरुस्त केली आणि तिला गुजराती भाषा विषयात २०० पैकी १९१ गुण आणि गणितातील २०० पैकी १९० गुण अशी दुरुस्ती करण्यात आली. तसेच, उर्वरित विषयांचे गुण अपरिवर्तित ठेवण्यात आले. सुधारित निकालासह, वंशीबेनचे एकूण गुण १००० पैकी ९३४ इतके होते.

पाहा उत्तरपत्रिका

Gujarat Student Gets 212 Out Of 200
Gujarat Student Gets 212 Out Of 200

हेही वाचा >> VIDEO: “आईबापाला घोटभर पाणी न देणारं पोरगं..” पुण्यात नेत्यांच्या प्रचाराला जाणाऱ्या तरुणांना भर चौकात लगावला टोला

याआधीही गुजरातमधील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना गुण जोडण्यात चुका केल्याबद्दल दोन वर्षांच्या कालावधीत ९ हजाराहून अधिक शिक्षकांना १.५४ कोटींचा एकत्रित दंड ठोठावण्यात आला होता.

तपास सुरू

दरम्यान, त्रुटीच्या प्रत्युत्तरात, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी कारण ओळखण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना लागू करण्यासाठी तपास सुरू केला आहे.