scorecardresearch

Premium

१५ हजार कुटुंबे, ११ हजार घरे आणि बरेच काही, नागपूरमध्ये पुरामुळे मोठे नुकसान

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६१४२ हेक्टरमध्ये पीकांचे तर ६०० घरांचे नुकसान झाले.

major flood in Nagpur affected 15000 families
(संग्रहित छायाचित्र)

नागपूर: शनिवारी नागपुरात आलेल्या पुरामुळे शहराच्या काही भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासनाने केलेल्या सर्वेक्षणातून जे आकडे पुढे आले त्यावरून पुराची व्यापकता किती होते हे स्पष्ट होते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुरामुळे नागपूर शहरातील १५ हजार कुटुंबे बाधित झाली. ११,२३८ घरे, ३०० दुकाने व टपऱ्यांना फटका बसला.

हेही वाचा >>> व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या

chemotherapy centers Maharashtra
आरोग्य विभागाची राज्यात ३५ जिल्ह्यांत डे-केअर केमोथेरपी केंद्र! टाटा कर्करोग केंद्राबरोबर सामंजस्य करार…
Deepak Kurade
कागल तालुक्यामध्ये अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार; बांधकाम विभागाचे उपअभियंता दीपक कुराडे यांचे उपोषण सुरू
Kunbi Maratha single family records in Panvel
पनवेलमध्ये आतापर्यंत कुणबी मराठा एकाच कुटूंबियांची नोंद आढळली
Anarock Group has released the 2023 report on the property sector in the major metros of the country  Pune news
सदनिकांचा आकार वाढतोय! तुमच्या शहरातील घरांचा सरासरी आकार जाणून घ्या…

५ घरे पूर्णत:तर १४९ घरांचे अंशत: नुकसान झाले. नदी-नाल्यावरील ३ पूल खचले, विविध ठिकाणी एकूण १०,३०१ मीटर नाला भिंत कोसळली. ३७,१९० मीटर रस्त्याचे नुकसान झाले आहे. १४ गुरांचे मृत्यू झाला. सर्वेक्षण करण्यासाठी १४५ कर्मचाऱ्यांचे एकूण ५० पथक तयार केल्या असून ७४०० घरांचे पंचनामे झाले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६१४२ हेक्टरमध्ये पीकांचे तर ६०० घरांचे नुकसान झाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 15000 families affected 11000 houses damage due to major flood in nagpur cwb 76 zws

First published on: 27-09-2023 at 18:48 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×