यवतमाळ : औद्योगिक मागास असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठा उद्योग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने यवतमाळ येथे प्रायोगिक तत्वावर २५ एकरात ‘फूड पार्क’ निर्माण करण्यात येणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. या विविध प्रकल्पातून पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याचेही सामंत म्हणाले.

यवतमाळ एमआयडीसी क्षेत्रात २५ एकरमध्ये फूडपार्क उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी दोन वर्षांपर्यंत जागा आरक्षित करण्यात यावी. तोपर्यंत उद्योग न आल्यास जागेचे आरक्षण पूर्ववत करण्याचा निर्णयही यावेळी घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अतिरिक्त यवतमाळ एमआयडीसी क्षेत्रात नवीन आराखड्यानुसार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २६ कोटी ८३ लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल. अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्रासाठी उद्योगांना वाढीव दर आकारले जात असून हे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ड+ आणि ड+ क्षेत्रात वसुली करून नका. पूर्वीच्या दराप्रमाणे वसुली करावी, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. युवकांच्या हाताला काम व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठा उद्योग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे, असे सामंत म्हणाले.

bank of maharashtra
‘महाबँके’चे ७,५०० कोटींचे निधी उभारणीचे लक्ष्य; मार्च तिमाहीत निव्वळ नफा १,२१८ कोटींवर
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री

हेही वाचा – रेल्वेच्या नागपूर विभागाने एका दिवसात केले १२.१५ लाख रुपये वसूल

हेही वाचा – गडकरी म्हणतात, ‘शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे…’

नेर तालुक्यातील वटफळी येथे शंभर ते तीनशे हेक्टर क्षेत्रात नवीन एमआयडीसी करण्याच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात मोठे उद्योग सुरु होणार आहेत. नेर तालुक्यात व्ही-तारा सारख्या मोठ्या कंपन्या उद्योग सुरु करणार आहेत. आगामी काळात जिल्ह्यात कोट्यवधींची गुंतवणूक येणार असून यातून तरुणांना रोजगार मिळणार आहे. हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यावेळी म्हणाले. या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांच्यासह उद्योग व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.