scorecardresearch

Premium

बुलढाणा मतदारसंघासाठी ५१ कोटींचा निधी, न्यायाधीशांची निवासस्थाने, रस्ते कामांना मिळणार गती

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

fund for Buldhana Constituency
बुलढाणा मतदारसंघासाठी ५१ कोटींचा निधी, न्यायाधीशांची निवासस्थाने, रस्ते कामांना मिळणार गती (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल ५१ कोटींची विकास कामे मंजूर करून घेतली आहे. यातून बुलढाण्यात न्यायाधीशांची निवासस्थाने, पूल व रस्त्यांची कामे होणार आहे.

हेही वाचा – बुलढाणा : चाळीस हजारांची लाच स्वीकारताना लिपिक जाळ्यात

lok sabha election 2024, nagpur district collector, offices, education institutes
लोकसभा निवडणुकीसाठी मनुष्यबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला ६७० कार्यालय-शाळांचा खो
Union Home Minister Amit Shah will visit Akola on March 5 to review five constituencies in Vidarbha
लाेकसभेच्या तोंडावर अमित शाह विदर्भात, अकोल्यात ५ मार्चला पाच मतदारसंघांवर भाजपचे मंथन; शिंदे गटाच्या मतदारसंघांचा…
voting pattern of kasba is now all over the country
पुणे : कसब्याचा ‘मतदान पॅटर्न’ आता देशभरात
Ajit Pawar news
भाजपच्या मतदारसंघात अजित पवारांची बांधणी, सतीश चव्हाणांना बळ देण्यावर भर

हेही वाचा – अमरावती : उत्पादन घट तरीही सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

बुलढाण्यात दिवाणी न्यायाधीश व मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याकरिता निवासस्थाने उभारण्याची मागणी त्यांनी केली केली. सदर निवासस्थानासाठी त्यांनी ७.८६ कोटी रुपयाच्या निधीची मागणी केली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग बुलढाणाअंतर्गत सदर कामास मंजुरी मिळाली आहे. तसेच मोताळा तालुक्यातील राजुर गुळभेली रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी ३ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित निधीतून मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणण्यात येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 51 crore fund for buldhana constituency residences of judges road works will be speeded up scm 61 ssb

First published on: 08-12-2023 at 13:23 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×