लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरात आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. नागपूरमध्येही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. नागपुरातील गणेश पेठ परिसरातील नितीन गडकरी यांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आपने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता नागपुरातील गणेशपेठेत आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला यावेळी उपस्थित होत्या.

आणखी वाचा-होळीवर करोनाचे सावट! वृद्धेचा मृत्यू; लोकसभा निवडणुकीवरही संक्रमनाचा धोका

कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात घोषणा देत होते. जवळच गडकरी यांचे प्रचार कार्यालय आहे. कार्यकर्ते त्या दिशेने कुच करू लागले. गडकरी यांचे कार्यालयापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी आंदोलकांना कार्यालयापासून शंभर मीटर अंतरावर अडवले. आंदोलनासाठी परवानगी न घेतल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत धक्काबुक्की झाली. कार्यकर्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरात आंदोलन केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap workers attempt to enter nitin gadkaris campaign office in nagpur vmb 67 mrj