नागपूर : खान अब्दुल गफ्फार खान हे आयुष्यभर सत्य, अहिंसा सांगत राहिले. त्यांना गांधी विचाराशी निष्ठेचे मोल चुकवावे लागले. आपण त्यांना भारतरत्न प्रदान करून प्रायश्चित केले, असे मत ज्येष्ठ संपादक, साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

खान अब्दुल गफ्फार खान जे सरहद्द गांधीच्या नावाने ओळखले जातात. त्यांच्या आत्मचरित्राची मराठी आवृत्ती ‘माझे जीवन आणि संघर्ष’ या नावाने प्रसिद्ध झाली. या आवृत्तीची प्रस्तावना द्वादशीवार यांनी लिहिली आहे. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रभाषा संकुलातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात शनिवारी या प्रस्तावनेचे वाचन द्वादशीवार यांनी केले. याप्रसंगी मंचावर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, अॅड. फिरदोस मिर्झा, चेतन कोळी, पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, रुपाली मोरे, प्रेमकुमार लुनावत, नीलेश खांडेकर उपस्थित होते.

Acknowledgment of work of Rajarambuwa Paradkar on the occasion of his centenary silver jubilee birthday
संगीत साधक पराडकर
“स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ते वाक्य पुन्हा खरं ठरलं,” निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत
Urdu, Akshar gappa,
कोल्हापूर : उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा हा मोठा गैरसमज – पी. डी. देशपांडे; गजलांच्या मराठी अनुवादाने अक्षरगप्पा रंगल्या
lokmanas
लोकमानस: उपचारांची गरज भाजपच्या निष्ठावंतांनाच
Loksatta vyaktivedh Dr Damodar Vishnu Nene Baroda Encyclopaedia Hindusthanika the book
व्यक्तिवेध: दादुमिया
Sambit Patra
“भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त”, पश्चात्तापदग्ध संबित पात्रांचे ३ दिवसांचे उपोषण
sitechi gosht aani itar katha, Aruna Dhere, Aruna Dhere s selected stories, Vandana Bokil Kulkarni, new marathi book, aruna dhere story book, marathi book, lokrang article,
‘समजुतीच्या काठाशी…’
adv harshal pradhan reply to vinay sahasrabuddhe article criticizing narendra modi government work
लेख : आम्हाला काय वाटले असेल?

हेही वाचा – अजित पवार यांना केदार यांचा टोला; म्हणाले, “विधानसभा निवडणुका येऊ द्या, बारामतीमध्ये…”

यावेळी द्वादशीवार म्हणाले, गफ्फार खान हे महात्मा गांधी यांचे सर्वश्रेष्ठ अनुयायी होते. ते आयुष्यातील २७ वर्षे तुरुंगात होते. त्यापैकी भारतातील तुरुंगात १० वर्षे आणि पाकिस्तानातील तुरुंगात १७ वर्षे होते. त्यांनी धर्मनिष्ठेपेक्षा स्वातंत्र्यनिष्ठा मोठी मानली. त्यांनी देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांचे शिष्यत्व स्वीकारले होते. त्यांच्याकडून त्यांनी सर्वधर्म समभाव स्वीकारला. त्यानंतर महात्मा गांधींच्या संपर्कात आले आणि आयुष्यभर गांधीवादी झाले.

फाळणीनंतर अब्दुल गफ्फार खान पाकिस्तानमध्ये गेले. तेथे त्यांनी गांधी विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. गांधी विचाराचा वारसा सांगणाऱ्या गफ्फार खान यांचा पाकिस्तानात छळ झाला. त्यांना अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. मात्र, ते आयुष्यभर सत्य, अहिंसा सांगत राहिले. त्यांनी आयुष्यभर गांधी निष्ठेचे मोल चुकवले आहे, असेही द्वादशीवार म्हणाले.

हेही वाचा – यवतमाळ पोलिसांची नामी शक्कल अन् सावज अलगद जाळ्यात अडकले; दुचाकी चोरीचे…

भारतात गांधींच्या नेतृत्वाखाली अब्दुल गफ्फार खान यांचे सर्व काही ठीक सुरू होते. ते ४७ वर्षे गांधी यांच्याशी एकनिष्ठ राहिले. महात्मा गांधींप्रमाणे खान यांनी देखील फाळणीचा कडाडून विरोध केला. ते अत्यंत त्वेषाने बॅरिस्टर जिनाविरुद्ध पाकिस्तानच्या निर्मितीविरुद्ध लढत होते, असेही द्वादशीवार यांनी सांगितले.