नागपूर : दिल्लीतील भोगल मार्केट परिसरात एका आरोपीने सराफा दुकान फोडून २५ कोटींचे दागिने चोरून नेले. एकट्याने स्ट्राँग रूम फोडून ३२ लॉकर्समधील दागिने आणि पाच लाखांची रक्कम पळविली. शेजारच्या इमारतीवरून चढून त्याने ही चोरी केली. दुकानातील सीसीटीव्ही आणि सायरन यंत्रणाही निकामी केली. अलिकडच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी चोरी मानली जाते. या घटनेच्या पृष्ठभूमीवर नागपुरातील बँका आणि सराफा दुकानांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. बँक आणि सराफा ओळीतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

छत्तीसगडच्या रायपूर येथील आरोपी लोकेश श्रीवासने दिल्लीत जाऊन सराफा दुकान फोडले. या घटनेवरून नागपुरातील सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. परप्रांतातील टोळीकडून नागपुरात चोरीचा प्रयत्न नाकारता येत नाही. त्यादृष्टीने व्यापारी परिसरात नजर ठेवण्यात येत आहे.   दिल्लीसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने दिशानिर्देश देण्यात आले असून शक्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात शहरातील सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे.

Umele residents, Umele survey, private land Umele ,
वसई : नव्या सर्वेक्षणात उमेळेवासियाना दिलासा, रेल्वे भूसंपादनात खासगी जागेला वगळले
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Rasta Roko, Nashik, Sakal Adivasi community, PESA sector, recruitment, Forest Land Act, Panchayats Extension to Scheduled Areas Act
पेसा भरतीसाठी वणीत रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत
MHADA, Mumbai, mhada house prices in Mumbai, expensive mhada house, house prices, 2030 house lot, expensive houses,
‘एलआयजी’तील घर अडीच कोटींचे! दुरूस्ती मंडळाकडून सोडतीसाठी मिळणाऱ्या घरांच्या विक्रीचा म्हाडासमोर पेच
Tata Punch SUV Car
देशातील बाजारपेठेत ६.१३ लाखाच्या SUV समोर क्रेटा, ब्रेझा, नेक्साॅनसह सर्वांची बोलती बंद, झाली दणक्यात विक्री
State Bank of india lending rate hiked for third consecutive month
स्टेट बँकेच्या कर्जदरात सलग तिसऱ्या महिन्यात वाढ
loksatta analysis political turmoil in bangladesh may shift world textile center to India
‘मेड इन बांगलादेश’ की ‘मेड इन इंडिया’? जागतिक कापड उद्योगाचे केंद्र अस्थिर बांगलादेशकडून भारताकडे सरकणार? 
Video of Tigress Nayantara in Nimdhela Buffer Zone of Tadoba Andhari Tiger Project circulated on social media
ताडोबाची वाघिण इटलीत…फिल्म फेस्टिव्हलच्या पुरस्कार सोहोळ्यात…

हेही वाचा >>> विदर्भातील एकमेव फुलपाखरू उद्यानाला पर्यटकांची पसंती; नेमके कुठे आणि काय आहे फुलपाखरू उद्यान वाचा…..

देशातील सर्वात मोठी बँक चोरी

देशातील सर्वात मोठी बँक चोरी केरळच्या मल्लापूरम येथे २००७ मध्ये झाली. मल्लापूरम परिसरात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर साऊथ मालाबार ग्रामीण बँकेचे कार्यालय होते. चोरांनी तळ मजला भाड्याने घेतला.  रेस्टॉरंट सुरू करण्याचा देखावा करीत सर्वांना विश्वासात घेतले. ३० डिसेंबर २००७ ला तळ मजल्यावरूनच बँकेची स्ट्राँग रूम फोडून ८० किलो दागिने आणि ८५ लाख रुपये एका रात्रीत पळविले.