चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ‘फुलपाखरू उद्यान आहे. पर्यटकांची पहिली पसंती अस प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या आगरझरी या गावी विदर्भातील पहिले फुलपाखरू उद्यान आहे. पर्यटकांची पहिली पसंती असलेले हे उद्यान वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारले गेले आहे. येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी बघायला मिळते.

चंद्रपूर जिल्हा ताडोबातील पट्टेदार वाघ, बिबट्या, काळा बिबट्या, हरीण, सांबार, अस्वल, चीतल, रानगवा, मोर तथा अन्य वन्य प्राणी, पक्षी यासाठी जगप्रसिद्ध आहे. पण येथे येणारा पर्यटक हा केवळ वाघ बघायलाच येऊ नये. तर त्याने ही वैदर्भीय निसर्गसृष्टीही अनुभवावी. या जंगलातील प्रत्येक जीवांचे कौतुक करावे, वनवैभव आपल्या डोळ्यात साठवून जावे, हे होत असताना त्यांनी येथील काही नाविण्यपूर्ण वस्तूंची आठवणही आपल्यासोबत न्यावी, यासाठी ताडोबाच्या बफरझोनमध्ये आगरझरी गावात वनविभागाने भव्य  बटरफ्लॉय गार्डन तयार केले आहे. विदर्भातील हे पहिलेच बटरफ्लॉय गार्डन आहे. चंद्रपूर शहरापासून १७  किलोमीटर अंतरावर हे उद्यान आहे.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
survey has revealed that 15 percent of the houses in the city do not even have a sight of sparrows
१५ टक्के घरांमधून चिमण्यांचे दर्शन दुर्लभ… काय सांगतोय अकोल्यातील सर्वेक्षणाचा निष्कर्ष?
Sharad Pawars offer to amar kale pawar says Fight for us as only one seat is up for grabs in Vidarbha
“विदर्भात एकच जागा वाट्याला आल्याने आमच्यातर्फे लढा,” शरद पवारांची ऑफर; अमर काळे म्हणतात, “वेळ तर द्या…”

हेही वाचा >>> लाभार्थी संख्येतील चढउताराने अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह; केंद्राची ‘यंग आर्टिस्ट’ शिष्यवृत्ती

सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे उद्यान सुरू असते. मोठ्यांसाठी २० रुपये, तर लहान मुलांसाठी १० रुपये शुल्क घेऊन या उद्योनात प्रवेश दिला जातो. येथे पर्यटकांना फुलपाखरांबद्दलची अत्यंत दुर्मिळ आणि महत्वाची माहिती अद्ययावत चित्रांद्वारे दिली जाते, त्यासाठी एक विशेष दालन तयार करण्यात आले आहे. यासोबतच बच्चे कंपनीसाठी खेळणी,  सेल्फी पॉईंट, झुलता पुल हेही या उद्यानाचे आकर्षण आहे. प्रत्येक फुलपाखराला राहायला, अंडी द्यायला आणि खाण्यासाठी विशिष्ट प्रकारचे झाड आणि फुल लागतात, त्यासाठी येथे खासप्रकारची झाडे लावण्यात आली आहे. येथे फुलपाखराच्या अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू या चारही अवस्था पाहायला मिळतात.

हेही वाचा >>> विवाहित मुलींनाही अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा अधिकार! उच्च न्यायालयाचा निर्णय

‘गवळी बॅरॉन’ फुलपाखराची नोंद आतापर्यंत ताडोबात झाली नव्हती. ते फुलपाखरूसुद्धा या उद्यानात आढळले असून, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉरमॉन’ हेसुद्धा येथे दिसते. ‘ब्लू मॉरमॉन’ हे फुलपाखरू भारतातील आकाराने सर्वात मोठ्या असलेल्या ‘सदर्न बर्डविंग’ या फुलपाखरानंतरचे सर्वात मोठे फुलपाखरू आहे. झाडांना औषध देणे, कटाई करणे इत्यादीसाठी दर मंगळवारी हे उद्यान बंद ठेवण्यात येते. राज्याचे वन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हे उद्यान आकाराला आले आहे.