scorecardresearch

Premium

…अन् माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच भारावले! नेमकं काय घडलं? वाचा…

ढोल ताशांच्या निनादात कार्यकर्ते स्वार, जोरदार घोषणाबाजी, दुतर्फा गर्दी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख चांगलेच भारावले.

Anil Deshmukh Samudrapur
…अन् माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच भारावले! नेमकं काय घडलं? वाचा… (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

वर्धा : ढोल ताशांच्या निनादात कार्यकर्ते स्वार, जोरदार घोषणाबाजी, दुतर्फा गर्दी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख चांगलेच भारावले. समुद्रपूर येथे प्रदेश सचिव अतुल वांदिले यांनी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चास चांगलीच गर्दी लोटली होती.

मोर्चा पाहून देशमुख यांनी ग्रामीण भागात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याची ही पावती होय, असे मत मांडले. मराठा समाजास आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणास बाधा येवू नये, असेही ते यावेळी म्हणाले. वांदिले यांनी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे, रानटी जनावरांचा उपद्रव, शेतमालाचे भाव, कृषीपंपाचा वीजपुरवठा, अपघातप्रवण रस्ते, आदी प्रश्न उपस्थित केले.

Manohar Joshi
मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांना ‘या’ योजनेचा आनंद अन् दुःखही, गडकरींनी सांगितला होता किस्सा
ram mandir congress
उत्तर प्रदेशच्या दोन काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री योगींसोबत अयोध्या यात्रा; पक्षांतर्गत मतमतांतरं असण्यामागे कारण काय?
Uddhav Thackeray and Ashok Chavan
Ashok Chavan Resigned: “आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपात”, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress in Marathi
Ashok Chavan Resigned: राहुल गांधींशी चर्चा केलीत का? पाचव्यांदा प्रश्न आल्यावर अशोक चव्हाणांचा सूचक इशारा

हेही वाचा – मराठा आरक्षण क्रांती मोर्चा: बुलढाण्यात येणाऱ्या मार्गांवर तगडा पोलीस बंदोबस्त

हेही वाचा – ‘बीआरएस’ही मैदानात! मराठा आरक्षणावर सुचविला ‘हा’ तोडगा

जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे तसेच समीर देशमुख, प्रलय तेलंग, गजानन शेंडे, अशोक वंदिले, दिनकर घोरपडे, अशोक डगवर, बबन हिंगणीकर, अशोक कलोडे, गणेश वैरागडे, संदीप किटे, ज्योती देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच विनोद कुटे तसेच संभाजी ब्रिगेडचे राजेश धोटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anil deshmukh got emotional at samudrapur in wardha pmd 64 ssb

First published on: 13-09-2023 at 12:21 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×