scorecardresearch

Premium

राज्यात गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के

राज्यातील पैदासक्षम गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के असल्याचे समोर आले आहे.

Artificial insemination rate among cows and buffaloes
राज्यातील दूध उत्पादन क्षमता वाढण्यासाठी गाय व म्हशींचे वंधत्व निवारण उपक्रम पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणार आहे.(फोटो- संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता टीम

अकोला : राज्यातील पैदासक्षम गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के असल्याचे समोर आले आहे. राज्यात वंध्यत्व असलेल्या व माजावर न येणाऱ्या गाय-म्हशींची संख्या सुमारे ४० लाख आहे. राज्यातील दूध उत्पादन क्षमता वाढण्यासाठी गाय व म्हशींचे वंधत्व निवारण उपक्रम पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणार आहे.

Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
World's first four-month-old baby to identify 100+ flashcards snk 94
अवघ्या ४ महिन्यांची कैवल्या ओळखते भाज्या, चित्रे, प्राणी, पक्षींसह १२० वस्तू! स्वत:च्या नावे केला जागतिक विक्रम
Thackeray Group
“शेतकऱ्यांना चक्रव्यूहात ठेवून पंतप्रधान अलहान मोदीच्या आत्मनंदात”, शेतकरी आंदोलनावरून ठाकरे गटाची टीका
maharashtra covid marathi news, covid jn1 variant maharashtra update marathi news, covid marathi news,
राज्यात नव्या वर्षात २७०० जणांना करोनाची बाधा, ‘जे.एन.१’बाधित रुग्णांची संख्या ६६६ वर; २१ रुग्णांचा मृत्यू

वंधत्व हे गाय, म्हैस भाकड राहण्याचे प्रमुख कारण आहे. सर्वसाधारणपणे कालवडी २५० किलो व वासरे २७५ किलो शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवतात. जनावरांमध्ये सलग तीन आठवडे वजनात घट दिसून आल्यास त्यांच्यात प्रजननाची कमतरता व वंधत्वाची बाधा आढळते. त्यामुळे जनावरांना रोज एक किलो पशुखाद्य, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, मुक्तसंचार, व्यवस्थापनात व्यायम, रोज ५० ग्रॅम खनिजमिश्रण, जंतनाशके, भरपूर पाणी याचे नियोजन आवश्यक आहे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-‘अमृत संस्थे’ला वालीच नाही का? खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील युवकांच्या उन्नतीसाठी…

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात दुधाळ गाय-म्हशींची दूध उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे गावोगाव वंधत्व निवारण उपक्रम राबविला जाणार आहे. शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गाय-म्हशींमध्ये उद्भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी अभियानाला सुरुवात झाली. मोहिमेत गावोगावात गाय-म्हशींची तपासणी व उपचारावर मार्गदर्शन केले जाणार आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी सांगितले.

तपासणीनंतर काही कमतरता आढळल्यास योग्य औषधोपचार आवश्यक असतात. गास-म्हशी व्याल्यानंतर ९० दिवसांच्या आत माजावर येऊन गाभण राहिल्यास त्यांच्यातील दोन वेतातील काळ कमी होण्यास मदत होते. गाय- म्हशी माजावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्यवेळी कृत्रिम रेतन न केल्यास जनावरांच्या दोन वेतांतील अंतर वाढणे, वर्षाला वासरू न मिळणे व खाद्यावरील खर्च होऊन पशुपालकाचे नुकसान होते. त्यामुळे यावर उपाययोजनेसाठी पशुपालकांनी अभियानात जनावरांवर उपचार करून घ्यावे, असे आवाहन डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले.

आणखी वाचा-हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न; आजपासून लक्षवेधी स्वीकारणार

अभियानामध्ये पशुंचा आहार व स्वास्थ्य, तसेच पशुधनाची वंधत्व तपासणी करून निदान करण्यात येणार आहे. जंत, गोचिड, गोमाशा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनावर, तसेच गोठ्यामध्ये नियमितपणे औषधी फवारणी, तसेच गाय-म्हशींमध्ये नियमित कालांतराने जंतनाशकाचा वापर करण्यावर मार्गदर्शन केले जाईल, असे डॉ. बुकतारे यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Artificial insemination rate among cows and buffaloes in the state is only 18 percent ppd 88 mrj

First published on: 30-11-2023 at 13:54 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×