scorecardresearch

Premium

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यातील पत्रकारांकडून ढाब्यावर जेवणाचे निमंत्रण

आज सर्व पत्रकारांनी खासदार सुनील मेंढे यांच्या घरी जाऊन खासदारांच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यात जेवणासाठी निमंत्रण पत्रिका दिली.

Chandrashekhar bawankule News
सुनील मेंढे यांना निमंत्रण पत्रिका देताना भंडारा येथील पत्रकार…

भंडारा : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपविरूद्ध बातम्या प्रकाशित होऊ नये याची काळजी घेण्यासाठी ‘पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या’ असा सल्ला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एका बैठकीत दिला. चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांची विशेष काळजी घेत असल्यामुळे त्यांचे ऋण फेडण्यासाठी भंडाऱ्यातील पत्रकारांनी त्यांना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता साईकृपा ढाबा, कवडशी फाटा, नागपूर रोड शहापूर येथे जेवणासाठी निमंत्रण दिले आहे.

हेही वाचा >>> वर्धा : पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांची गणेश विसर्जन केंद्रास पसंती; नद्या, तलाव ओस

Ajit Pawar wife v_s Supriya Sule
बारामतीत अजित पवारांची पत्नी विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यातील लढत जवळपास निश्चित; कोण आहेत सुनेत्रा पवार?
Amol Mitkari on Jitendra Awhad
‘घाऱ्या डोळ्यांचा तथाकथित पुरोगामी’, अजित पवारांवरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा आव्हाडांवर पलटवार
Uday Samant about Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुन्हेगारांच्या छायाचित्रांबाबत उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांसोबत कोणी छायाचित्र काढल्यास…”
Atishi
केजरीवालांपाठोपाठ आप मंत्र्याच्या घरी दिल्ली क्राईम ब्रँचची धडक, आमदारांच्या घोडेबाजाराचं प्रकरण

आज सर्व पत्रकारांनी खासदार सुनील मेंढे यांच्या घरी जाऊन खासदारांच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यात जेवणासाठी निमंत्रण पत्रिका दिली. या निमंत्रण पत्रिकेत चहा आणि जेवणाची व्यवस्था केलेली असून जेवणात बावनकुळे यांच्या आवडीनुसार मेन्यू राहील तसेच त्यांना अपेक्षित पाण्याचीही व्यवस्था केली असल्याचे नमूद केले आहे. जेवणाचे संपूर्ण बिल देण्यासाठी पत्रकार सक्षम असल्याचेही यात स्पष्ट केले आहे. या शिवाय धाब्यावर जेवनासाठी येताना खासदार सुनील मेंढे, भाजपचे भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे , शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर यांनाही बावनकुळे यांनी सोबत आणावे असे पत्रकारांनी सुचविले आहे. निमंत्रण पत्रिका देतेवेळी भंडाऱ्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp state president chandrashekhar bawankule invite journalists from bhandara at dhaba for dinner ksn 82 zws

First published on: 28-09-2023 at 15:43 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×