बुलढाणा : महायुतीमध्ये वादंगाचा विषय ठरलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांनी आज वेगळेच वळण घेतले आहे. पक्षीय उमेदवारांबरोबरच भाजपकडे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्या रूपाने तगडा पर्याय असल्याची चर्चा वेगाने पसरली. यासंदर्भात विचारणा केली असता दस्तुरखुद्द चांडक यांनी याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे.

निवडणूक आचारसंहितेचा मुहूर्त नजीक आल्यावरही बुलढाणा मतदारसंघातील जागा वाटप आणि उमेदवारीचा राजकीय तिढा कायम आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतरही हा तिढा कायम आहे. दुसरीकडे भाजपच्या मतदारसंघातील आढावा बैठकांचा धडाका कायम आहे. घाटावरील सहा तालुक्याच्या मेहकर येथील बैठकीत लोकसभा प्रमुख विजयराज शिंदेसह कार्यकर्त्यांनी बुलढाणा भाजपकडे घेण्याची जोरदार मागणी केली. त्यापूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांच्या गृहक्षेत्रात भाजपकडून जंगी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यामुळे भाजपा बुलढाण्यासाठी किती आग्रही आहे आणि अंतिम क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न करणार हे स्पष्ट झाले.

Elections in eight constituencies today in the second phase in the maharashtra state
आठही मतदारसंघांत चुरशीच्या लढती; दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान
amol kolhe marathi news, shivajirao adhalarao patil marathi news
“उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले!”, ‘त्या’ विधानावरून अमोल कोल्हेंचा टोला
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Dharashiv Lok Sabha
हाती घड्याळ बांधलेल्या उमेदवारालाच ‘घड्याळा’ची वाढ नकोशी

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

हेही वाचा – “पुन्हा भाजप सत्तेत आल्यास अराजकता”, प्रकाश आंबेडकर म्हणतात, “संविधान बदलण्याचा घाट…”

हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”

सहकार क्षेत्रात बुलढाण्याचे नाव देशपातळीवर नेणारे राधेश्याम चांडक हे देखील बुलढाण्यातून लढण्यास तयार असल्याची चर्चा आज रंगली. यासंदर्भात थेट चांडक यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. “आपण भाजपकडे उमेदवारी मागणार नाही, पण पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच लढणार”, असे चांडक यांनी स्पष्ट केले. भाजपचा विकासाचा मुद्दा लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. मागील काळात (एकसंघ) राष्ट्रवादीमध्ये कार्यरत होतो. पण मागील अनेक महिन्यांपासून त्या पक्षापासून अंतरावर असल्याचे ते म्हणाले.