चंद्रपूर : दररोज आठ तास नियमित अभ्यास केला पाहिजे, किमान आठ तास झोप घेतली पाहिजे, दररोज मित्रांसोबत एक तास गप्पागोष्टीत घालविला पाहिजे आणि आठवड्याला एक सिनेमा बघितला पाहिजे. विज्ञान विषय घेवून कॉपी करून पास होण्यापेक्षा, कला शाखेत इतिहास घेवून पदवीधर झाले तरी युपीएससीची परिक्षा देऊन आयएएस अधिकारी होता येते. हा संवाद आहे पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी गावच्या सोहम सुरेश ऊईके या आठव्या वर्गातील विद्यार्थी व चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्यातील. सध्या या संवादाची चित्रफित समाज माध्यमावर चांगलीच सार्वत्रिक झाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी आणि सोहम सुरेश ऊईके या विद्यार्थ्यांची भेट मॉर्निंग वॉकमध्ये रस्त्याने सायकलिंग करताना झाली. यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी मुलाशी संवाद साधला असता, या आठव्या वर्गातील मुलाने भविष्यात आयएएस अधिकारी होण्याची इच्छा बाेलून दाखविली. आईवडील दोघेही खासगी नोकरी व मिळेल ते काम करित असलेल्या गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या सोहमने अतिशय बिनधास्तपणे पोलीस अधीक्षकांशी संवाद साधला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – चंद्रपूर : सिंदेवाही जंगलात ओडीसातील हत्तीचा मुक्काम, पिकांचे नुकसान

समाजाकडून आपल्याला चांगल्या व वाईट दोन्ही गोष्टी मिळत असतात. चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायचा आणि वाईट गोष्टी सोडून द्यायच्या असेही सोहम म्हणतो. कुठल्याही मुलाने शिक्षण घेऊन आदर्श व्यक्ती बनले पाहिजे. केवळ अभियंता व डॉक्टर झाले नाही म्हणून निराश न होता आवडीचे काम करावे असेही सोहम म्हणतो. सोहमच्या या बोलण्याने पोलीस अधीक्षक परदेशी चांगलेच प्रभावित झाले आहे. त्यांनी विद्यार्थ्याला युपीएससी परिक्षा देण्यासाठी आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा – कुख्यात ‘शिनू’ टोळीविरुध्द मोक्का; यवतमाळसह नागपुरात खुनाचे पाच गुन्हे

विशेष म्हणजे सोहमच्या कुटुंबात दोन पिढ्यांपासून सरकारी नोकरीत कुणीही लागलेले नाही. त्यामुळे मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आयएएस अधिकारी होणार, असे सोहम स्पष्टच सांगतो. इतिहास, भूगोल या विषयासोबतच हडप्पा संस्कृती या विषयांवरदेखील सोहमने चर्चा केली. मनुष्य हा आयुष्यभर शिकत असतो असेही सोहम म्हणतो.

Story img Loader