वर्धा : सत्ताधारी भाजप आता तिसऱ्या वेळी मतदारांसमोर जात आहे. अँटी इन्कम्बन्सी काही प्रमाणात राहणार, हे गृहीत धरून कामाची गती वाढविण्याच्या सूचना ज्येष्ठ नेत्यांकडून स्थानिक पातळीवर देण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे याच कामाचा आढावा घेत असल्याचे सांगितले जाते. शनिवारी रात्री ते वर्धा लोकसभा मतदारसंघ कोअर कमिटीची गोपनीय बैठक घेणार होते. मात्र त्यांना वेळेवर पुणे येथे जावे लागले. मात्र तरीही त्यांनी रात्री उशीरा ऑनलाईन संवाद साधलाच.

उमेदवार रामदास तडस यांच्या निवासस्थानी हा संवाद संपन्न झाला. त्यात कोअर कमिटीचे झाडून सर्व सदस्य हजर होते. यात क्षेत्रनिहाय प्रचार करायचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी बावनकुळे यांनी स्पष्ट केली जे होत आहे ते पुरेसे समाधानकारक नाही. कामाची गती वाढवा. समन्वय ठेवा, अन्यथा जबाबदारी फिक्स करू, असा इशारा त्यांनी दिल्याचे या सभेत उपस्थित एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
What is the total wealth of NCP candidate Amar Kale
“असावे घरकुल ठिकठिकाणी”, अमर काळे यांच्या संपत्तीचे विवरण असे…
ramdas tadas
‘‘हे एकदाचं थांबवा,” रामदास तडस यांना भाजप नेत्यांचा निर्वाणीचा इशारा
wardha lok sabha seat, Dr. Sachin Pavde, maha vikas aghadi candidate amar kale, Dr. Sachin Pavde s Presence congress event, Sparks Speculation congress entry,
‘हे’ प्रसिद्ध डॉक्टर व समाजसेवी काँग्रेसमध्ये? नेमके काय झाले, वाचा…

हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान…

२०१४ मध्ये ५३ टक्के मते मिळाली. तर २०१९ मध्ये ५१ टक्के मते तडस यांना पडली होती. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसची मते पाच टक्क्यान्नी वाढली होतो. आता आघाडीने दिलेला उमेदवार सध्याच पाच टक्के मतांनी वाढला आहे. काहीही न करता मते वळली, याचे कारण शोधल्या जात आहे. सध्या भाजप व आघाडीच्या काळे यांच्यात एक लाख मतांचे अंतर आहे. अजून १५ दिवस बाकी आहे. धोका कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यावर या बैठकीत सर्वांचे एकमत झाले.

हेही वाचा…बच्चू कडूंचा महायुतीवर अमरावतीनंतर रामटेकमध्येही ‘प्रहार’

कोअर कमिटीचे एक सदस्य सुमित वानखेडे म्हणाले की, केंद्रीय समितीने निवडणूक काळात अपेक्षित कामांबाबत काही सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन योग्य प्रकारे होत आहे अथवा नाही याचा आढावा बावनकुळे यांनी घेतला, असे नमूद करीत वानखेडे यांनी अधिक भाष्य टाळले. इशारा देणारी ही ऑनलाईन बैठक झाली असली तरी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी असे खबरदार केल्या जात असतेच. त्यात वावगे काही नाही. आम्ही आजही आघाडीच्या उमेदवारपेक्षा पुढेच आहोत व पुढेच राहणार, असा विश्वास सभेत उपस्थित एका नेत्याने लोकसत्तासोबत बोलताना व्यक्त केला.