वाशीम : आमचं सरकार दोन वर्षात सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांगीन विकास करीत आहे. फेसबुक लाईव्ह करणार आमचं सरकार नसून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार सरकार आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ मंगरुळपीर येथील जाहीर सभेसाठी आले असता माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ दहा वर्षात देशाचा असा विकास केला जो काँग्रेसला मागील पन्नास-साठ वर्षात करता आला नाही आणि पुढील शंभर वर्षात करू शकणार नाही. आम्हाला केंद्र सरकारचा मोठा हातभार मिळत आहे. आमचं सरकार जनतेचं ऐकणार सरकार आहे. लोकांच्या अडचणी सोडवतो, जनतेच्या हिताचे निर्णय घेतो. त्यामुळे आम्ही लोकांसमोर विकासाचा मुद्दा घेऊन जातोय आणि जनता आमच्या पाठिशी उभी राहील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा…भाजपला स्वकीयांपेक्षा मित्रपक्षाची साथ, तर काँग्रेस संभ्रमात! गडचिरोली-चिमूरचा खासदार कोण होणार

बॅनरवर स्थानिक नेत्याचे छायाचित्र नाहीत

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी लावलेल्या बॅनरवर स्थानिक नेत्यांचे छायाचित्र नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.