बुलढाणा : लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्या तरी राज्य सरकार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री शिंदे येथे आले होते. त्यांनी धाड नाका परिसरातील ओंकार लॉन्स येथे संध्याकाळी सहा वाजता पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे निवडक प्रसिद्धी माध्यमांशी अल्पसंवाद साधला. यावेळी ते म्हणाले, निवडणूका सुरू असल्या तरी मी रोज सकाळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून आपत्तीची माहिती घेतो.

हेही वाचा…“इंडिया आघाडीचा ना झेंडा, ना अजेंडा,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका; म्हणाले…

कुठे गारपीट, कुठे अवकाळी पाऊस याची माहिती जाणून घेतो. यानंतर या अधिकाऱ्यांना पंचनामे, सर्वेक्षण व मदत करण्याचे निर्देश देतो. त्यामुळे निवडणुका असल्या तरी बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यावेळी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde assures aid to disaster hit farmers amidst election campaign scm 61 psg