नागपूर : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदाससंघात १९ एप्रिलला मतदान होणार असून सर्व उमेदवार प्रचाराला लागले आहेत. या प्रचारधुमाळीत अनेक राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी आचारसंहितेचा भंग करीत असल्याचे दिसून आले असून यासंदर्भात ‘सी-व्हिजिल ॲप’वर ३१ तक्रारी आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी नेत्यांच्या फलकांच्या (होर्डिंग, बॅनर) बाबत आहेत.

हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ

Sharad Pawar Wardha
रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ
wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
“आम्ही तुमची माफी स्वीकारणार नाही, कारवाईला सामोरे जा”; बाबा रामदेव यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”

हेही वाचा – “महायुती भ्रष्ट उमेदवार देणार की नवीन चेहरा देणार?”, भावना गवळींच्या उमेदवारीवर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

हेही वाचा – ‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना ‘सी-व्हिजिल ॲप’ची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिक आक्षेपार्ह छायाचित्र वा चित्रफीत या ॲपवर पाठवून त्याची तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारीवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. त्यासाठी १०० मिनिटांच्या आत तक्रारी निकाली काढण्याचे सूचित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात यासाठी चार भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता भंग झाल्याच्या १७ तक्रारी या ॲपवर दाखल झाल्या. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात १४ तक्रारी आल्या आहेत. पक्षाचे नाव, बोधचिन्ह असलेले होर्डिंग, बॅनर याबाबत तक्रारी होती. या तक्रारींचा ६५ ते ७० मिनिटांत निपटारा झाला.