चंद्रपूर : काँग्रेसमधील पक्षांतर्गत विरोधामुळे पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्याने काँग्रेस पक्षात एकच खळबळ उडाली आहे. तर आमदार धानोरकर सारख्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी असे बेछुट वक्तव्य करणे म्हणजे पक्षाची प्रतिमा मलिन करणे होय, असे एकोणाचे सरपंच व वरोरा बाजार समितीचे संचालक गणेश चवले यांनी म्हटले आहे.

लोकसभा उमेदवारीवरून या जिल्ह्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात शितयुद्ध सुरू आहे. वडेट्टीवार यांनी स्वत:ची मुलगी तथा प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हिच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळ दिल्ली येथे पाठविले. त्यानंतर काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद अधिक प्रकर्षाने समोर आला. दोन दिवसांपूर्वी आमदार धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षातील अंतर्गत विरोधामुळे पती खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. धानोरकर यांच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे पक्षातील काही लोक कारणीभूत आहेत असा आरोप केला. आता हेच लोक माझ्या मागे लागले आहेत. एक जीव गेला आता दुसरा जीव जावू देणार नाही, असेही धानोरकर म्हणाल्या.

ubt shiv sena candidate chandrahar patil meet congress leaders in sangli
बंडखोरीवर कारवाई टाळत मविआ उमेदवाराला विजयी करण्याचे पटोलेंचे आवाहन
Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

हेही वाचा – ‘लोकसत्ता’चा दणका : कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन डॉक्टरांची सेवासमाप्ती, जारावंडी लैंगिक अत्याचार प्रकरण

या आरोपांमुळे काँग्रेस पक्षात सर्वत्र खळबळ उडाली असताना आज वरोरा बाजार समितीचे संचालक तथा एकोणाचे सरपंच गणेश चवले, अविनाश गोंडे, शंकर मडावी, उमेश माहुरे यांनी धानोरकर यांनी असे बेजबाबदार व बेछुट आरोप केल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – खबरदार! लोकसभेसाठी खर्च ९५ लाखांवर गेला तर…, उमेदवारांवर यंत्रणांचे राहणार लक्ष

प्रत्येकाला लोकसभेची उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. काँग्रेसच्या उमेदवारीवर केवळ माझाच हक्क आहे असे कुणी म्हणणे योग्य नाही. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात आलेल्या धानोरकर यांना काँग्रेसच्या निष्ठावंतांना हे सांगायची गरज नाही. स्व. बाळू धानोरकर यांचा मृत्यू कशामुळे झाला हे सर्वश्रृत आहे. धानोरकर यांच्या बेछूट आरोपांनी काँग्रेस कार्यकर्ता दु:खावला आहे, असेही चवले म्हणाले. काँग्रेसने सर्वसमावेशक उमेदवार दिला तरच लोकसभा जिंकता येईल, असेही ते म्हणाले.