वनवासी कल्याण आश्रमाच्या अधिवेशनात मागणी
महाराष्ट्र वगळता देशातील इतर आदिवासी राज्यांमध्ये ‘पेसा’ आणि वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारे ठराव वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात संमत करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर येथे हे अधिवेशन सुरू असून उद्या, रविवारी त्याचा समारोप होणार आहे. शनिवारी झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हे ठराव पारित करण्यात आले. २००६ चा वनाधिकार कायदा उत्तर पूर्वाचलच्या सात राज्यांसह लागू करण्यात यावा, त्याचे स्वरूप एकसमान असावे आणि राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव अभयारण्य यासारख्या संरक्षित ठिकाणी हा कायदा लागू केला जावा, अशी मागणी एका ठरावाव्दारे करण्यात आली आहे.  या कायद्यानुसार वनात राहणाऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात आले असले तरी अद्याप सामुदायिक अधिकार देण्यात विशेष प्रगती झालेली नाही. ग्रामसभेच्या परवानगीशिवाय तसेच सामाजिक अंकेक्षणाशिवायच आदिवासींची जमीन मोठय़ा प्रकल्पांसाठी संपादित केली जात आहे. हा प्रकार ताबडतोब बंद करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand to effective implementation of pesa and the forest rights act in maharashtra
First published on: 04-10-2015 at 04:33 IST