नागपूर  : जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या सिंधू समाजाच्या प्राचीन परंपरेची महती सर्वांपर्यत  पोचविण्यासाठी नागपूर येथे लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल.यासाठी जागा निश्चिती करण्यात आली असल्याचे व १४० कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त झाला आहे .असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आंदोलनात घर जाळणे, हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यासंदर्भातील गुन्हे मागे घेतले जाणार नाही – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमात  फडणवीस बोलत होते.अनेक शतकाची परंपरा असलेल्या व सनातन संस्कृती जीवीत ठेवणाऱ्या सिंधी समाजाने कष्टाने उद्योग व्यापारात प्रगती केली.  जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या सिंधू समाजाच्या प्राचीन परंपरेची महती सर्वांपर्यत  पोचविण्यासाठी नागपूर येथे लवकरच ‘सिंधू आर्ट गॅलरी’ स्थापन करण्यात येईल.यासाठी जागा निश्चिती करण्यात आली असल्याचे व १४० कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त झाला आहे असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> ‘परीक्षा पे चर्चा’ गुरुजींसाठी ठरतेय डोकेदुखी

फाळणीनंतर या समाजाला येणाऱ्या अडचणीची आपल्याला जाणीव असून त्यांना राज्यात मालकी हक्काचे पट्टे मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री यांनी दिले. कार्यक्रमाला आमदार कुमार आईलानी, सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर,अकादमीचे सदस्य राजेश बटवानी, मंजु कुंगवानी,तुलसी सेनिया तसेच ॲड. डॉ.  दयाराम लालवानी, घनश्याम कुकरेजा, विरेंद्र कुकरेजा आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी आ. कुमार आईलानी, घनश्याम कुकरेजा, महेश सुखरामानी, विरेंद्र कुकरेजा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी सिंधी  समाजातील ज्येष्ठ समाजसेवक ॲड. डॉ.  दयाराम लालवानी यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर ‘वरसो न विसार’ या सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis received sindhu art gallery in nagpur proposal for approval cwb 76 zws
First published on: 28-01-2024 at 12:45 IST