नागपूर : बाजारात शेतमाल विकल्यानंतर मौजमस्ती करण्यासाठी गंगाजमुनात गेलेल्या एका मौद्याच्या शेतकऱ्याला दोन वारांगणा आणि एक दलालाने मारहाण करुन लुटले. त्याच्या खिशातील पैसे, अंगठी आणि सोनसाखळी हिसकावून घेतली. या प्रकरणी तिघांविरुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून दलालासह वारांगणेला अटक करण्यात आली आहे. रवी (४०) रा. नंदनवन आणि अफसाना (३०) रा. गंगाजमुना असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर बरखा ही फरार झाली. 

हेही वाचा >>> तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk farmer beaten up and robbed by two prostitute and broker in ganga jamuna red light area adk 83 zws
First published on: 23-04-2024 at 23:04 IST