राम भाकरे

नागपूर: विदर्भातील विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासोबतच वारकरी संप्रदायाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने पंढरपूरच्या धर्तीवर नागपुरातील बेसा परिसरात वारकरी भवन व वारकरी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी  विश्व वारकरी सेवा संस्थेने पुढाकार घेतला आहे.

Registrar, Hindi University,
‘विद्यार्थ्याचे भविष्य उद्ध्वस्त करू नका’, हिंदी विद्यापीठाच्या कुलसचिवांवर न्यायालयाचे ताशेरे
nagpur university marathi news, nagpur university loksatta marathi news
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थी परीक्षेसाठी केंद्रावर गेले अन् असा प्रकार घडला की…..
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी

अनेक वर्षांपासून मुलांमध्ये आध्यात्मिक आवड निर्माण करण्यासोबतच वारकरी परंपरेचे शिक्षण मिळावे, यासाठी वारकरी सेवा संस्थेने प्रयत्न सुरू केले आहे.विदर्भातील अनेक तरुण वारकरी परंपरा शिकण्यासाठी पंढरपूर, देहू, आळंदी येथे जातात. त्यांना विदर्भातच वारकरी शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी विश्व वारकरी सेवा संस्था प्रयत्न करीत आहे. यासाठी संस्थेने बेसा स्वामी समर्थ मंदिर परिसरात जागा घेतली आहे. येथे वारकरी भवनाची उभारणी केली जाणार आहे. तसेच  विश्वविद्यालयात समाजातील अनाथ, निराधार मुलांसह पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. बाहेरगावी राहणाऱ्या आणि वारकरी परंपरा शिकण्याची इच्छा असलेल्यांनाही मोफत निवास व शिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष संदीप कोहळे यांनी सांगितले.