भंडारा : भंडारा नगरपालिकेच्या जमनी येथील डम्पिंग यार्डमध्ये चोरीची वीज वापरीत असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी भंडारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आज ही वीज चोरी पकडली असून ४८ तासात दंडाची रक्कम भरण्याचे आदेश बजावले आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

भंडारा – वरठी मार्गावरील जमनी येथे भंडारा नगरपालिकेचे डम्पिंग यार्ड आहे. येथे बांधकाम सुरू असून यासाठी चोरीची वीज वापरली जात असल्याचे गंभीर प्रकरण आज उघडकीस आले. महावितरणचे  अधिकारी दुपारी डम्पिंग यार्ड मध्ये जेव्हा रीडिंग घ्यायला गेले तेव्हा त्यांना ही चोरीची बाब लक्षात आली.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका

हेही वाचा >>> अमरावती : खळबळजनक! शेतकऱ्यावर काठ्या, विटा, दगडाने सामूहिक हल्ला; अडीच लाखांची रोकड व दागिने पळवले

आकोडा टाकून बांधकामासाठी वीज चोरण्यात येत असल्याची बाब समोर आल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ती पकडली. यावेळी काम कंपनीचे सुपरवायझर संजय पटेल यांना महावितरणने दंडाची रक्कम ४८ तासात भरण्याचे आदेश बजावले आहे. ही रक्कम न भरल्यास त्यांच्यावर वीज चोरल्या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्याचे संकेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. या वीज चोरीसाठी वापरण्यात आलेला ६०० फूट केबल महावितरणने जप्त केला आहे.

दंड न भरल्यास फौजदारी कारवाई

नगरपालिका डंपिंग यार्ड मध्ये महावितरणचे पथक रीडिंग घ्यायला गेले असता, त्यांना वीज प्रवाहित तारांमधून डायरेक्ट वीज चोरी करीत असल्याचं गंभीर प्रकरण लक्षात आले.  याप्रकरणी संजय पटेल यांना दंडाची रक्कम महावितरण नियमानुसार भरण्याचे आदेश बजावले आहे. ४८ तासात दंड न भरल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

– जयंत डमके, सहायक अभियंता, महावितरण