scorecardresearch

Premium

कळमेश्वरच्या जंगलात सिंह पाहिल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल, अफवा पसरवणारा ताब्यात

कृत्रिम बुद्धीमत्ता वापरुन सिंहाचा व्हिडिओ तयार करणे एवढेच नाही तर तो समाजमाध्यमावर प्रसारित करणे एका युवकास चांगलेच महागात पडले.

Fake video of lion sighting in Kalameshwar forest
कृत्रिम बुद्धीमता वापरुन तयार केलेला व्हिडिओ त्याने समाजमाध्यमावर प्रसारित केला. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर : कृत्रिम बुद्धीमत्ता वापरुन सिंहाचा व्हिडिओ तयार करणे आणि उपराजधानीलगत कळमेश्वर वनपरिक्षेत्रात सिंह पाहिल्याचे सांगणे, एवढेच नाही तर तो समाजमाध्यमावर प्रसारित करणे खोटी माहिती देणे एका युवकास चांगलेच महागात पडले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी व कार्यवाहीकिरता कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या सुपूर्द केले.

Dr Pramod Chaudhary Promoter of Praj Parva
डॉ. प्रमोद चौधरी ‘प्राज’पर्वाचे प्रवर्तक
youtubers in trouble over prank video
“अंबानींबरोबर चहा घेतलेले काका”, युट्यूबवरील प्रँक VIDEO पडला महागात! गुजरातमध्ये नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर!
Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
a 45-year-old cyclist Anil Kadsur dies of heart attack
प्रसिद्ध सायकलपटूचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तीव्र प्रकारच्या व्यायामाचा हृदयावर कसा परिणाम होतो?

वनपरिक्षेत्र कळमेश्वरअंतर्गत उपवनक्षेत्र आदासामधील मोहपा बिटातील मौजा बुधला या गावाच्या चौरस्त्यावर प्रताप मडावी यांनी मी सिंह पाहिला आणि त्याचा व्हिडिओ तयार केला असे वनखात्याला कळवले. एवढेच नाही तर कृत्रिम बुद्धीमता वापरुन तयार केलेला व्हिडिओ त्याने समाजमाध्यमावर प्रसारित केला.

आणखी वाचा-नागपूर : रावणाची उपमा आणि मोदींवर टीका, वाचा सविस्तर…

वनपरिक्षेत्र अधिकारी कळमेश्वर व अधिनस्थ क्षेत्रसहाय्यक व वनरक्षक यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत चौकशी केली असता या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे त्याला आढळून आले. सिंह पाहिल्याची खोटी अफवा पसरवल्यामुळे कळमेश्वर येथील प्रताप मडावी याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि पुढील चौकशी व कार्यवाहीकरिता कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आले. ही कार्यवाही उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा व विभागीय वनाधिकारी पी.जी. कोडापे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक श्री. बागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरपूरकर, क्षेत्र सहाय्यक के.एम. जामगडे, बिटरक्षक पी.एन. वावधने, जी.आर. मानकर, जी.जी. मेंढे, पी.यू. पाटील यांनी पार पाडली. अशा प्रकारचे बनावट व्हिडिओ व्हायरल करुन जनसामान्यात भीतीचे वातावरण पसरवू नये असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fake video of lion sighting in kalameshwar forest goes viral rumour spreader arrested rgc 76 mrj

First published on: 06-10-2023 at 16:10 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×