अमेरिकेतील दाम्पत्याची फसवणूक प्रकरण

नागपूर : अमेरिकेत राहणाऱ्या नागपूरकर दाम्पत्याचा कोटय़वधीचा भूखंड तोतया व्यक्ती आणि बनावट कागदपत्र तयार करून गहाण ठेवल्यानंतर परस्पर विकल्याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी कन्यका नागरी सहकारी बँकेच्या संचालक आणि पदाधिकाऱ्यांसह १६ जणांवर गुन्हे दाखल केले. डॉ. तुकाराम भास्करवार, दीपक गुंडावार, किशोर जोरगेवार, संतोष चिल्लरवार, विलास वेंगीनवार, धनंजय ताटपल्लीवार, नितीन आयिचवार आणि किशोर गोलीवार असे बँकेच्या पदाधिकाऱ्यांची नावे असून यांच्यासह स्वप्निल भोंगाडे (बेसा), शिशिर भोंगाडे (मनीषनगर), संजय उमाठे (नरेंद्रनगर), दिनेश ढोके (महाल), पराग भोसले, अनिता भोसले (महाल), नरेश मौंदेकर (राऊत चौक) आणि यशवंतसिंग सकरवार (शांतीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

police constable suspended for helping drug smuggler
अंमली पदार्थ तस्कराला मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई
Thane, ST, bogus certificate,
ठाणे : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटी महामंडळात नोकरी
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला मनोहर कऱ्हाडे (विक्रोळी, मुंबई) यांनी कन्यका नागरी सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य आठ जणांविरुद्ध तक्रार अर्ज केला होता. इलेक्ट्रिक अभियंता असलेले मनोहर कऱ्हाळे हे मूळचे नागपूरचे असून त्यांच्या मालकीचा खामला परिसरात भूखंड होता. १९६५ ला नोकरीनिमित्त ते अमेरिकेत गेले होते. शीला या मूळच्या मुंबईच्या असून त्या शिक्षणासाठी अमेरिकेत होत्या. त्यांची मनोहर कऱ्हाडे यांच्याशी ओळख झाल्यानंतर दोघांनी लग्न केले. दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले होते. २०१८ मध्ये ते अमेरिकेतून परत आले आणि  २०१९ ला मनोहर कऱ्हाळे यांचा मृत्यू झाला. जून २०२० ला कन्यका नागरी सहकारी बँक चंद्रपूरच्या सीताबर्डी  शाखेने मनोहर कऱ्हाडे नावाच्या व्यक्तीचा भूखंड लिलावास काढल्याची माहिती मिळाली. शिला कऱ्हाडे यांनी लगेच बजाजनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. आरोपी स्वप्निल भोंगाडे याच्या कन्यका नागरी बँकेतील कर्ज खात्यास तो भूखंड गहाणखत असल्याचे दाखवण्यात आले होते. बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून मनोहर कऱ्हाडे नावाची तोतया व्यक्ती उभी करून तो भूखंड गहाण ठेवला. त्या भूखंडावर १ कोटी २५ लाखांची उचल करण्यात आली. बँकेचे दलाल पराग भोसले आणि अनिता भोसले यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा ६० लाखांचे कर्ज काढले होते. कर्ज न भरल्याने तो भूखंड कन्यका नागरी बँकेने लिलावात काढून आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप शीला कऱ्हाडे यांनी केला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी बँकेच्या आठ पदाधिकाऱ्यांसह १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.