महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी केला.

हेही वाचा- ‘सामान्य शाळांमधील मूलभुत सुविधांसाठी लोकसहभाग महत्वाचा’; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : निवडणूक लोकसभेची की ग्रामपंचायतीची?
Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
What Aditya Thackeray Said?
“४० गद्दारांनी आता विचार करावा..”, आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य

शेगाव येथे आज, १८ नोव्हेंबरला पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रतिसाद व प्रेम काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटिशांसमोर झुकले नाहीत, असे सांगताना त्यांची तुलना सावरकरांशी केली. यामुळे महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? भारत जोडो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करून मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात सावरकर यांनीच मांडला.१९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते. मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते, हे ऐतिहासिक सत्य आहे, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा- नागपूर: राहुल गांधींच्या जाहीर सभेसाठी आलेल्या वाहनांमुळे शेगावजवळ वाहतूक कोंडी

राहुल गांधी यांच्या सुरक्षेची भारतयात्रींना चिंता

राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असे रमेश यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- नागपूर : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढतेय! नियंत्रणाचे काम सोडून पोलीस शोधतात ‘सावज’

यात्रेत उद्या नारीशक्त

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त उद्या, १९ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग असेल. उद्या नारीशक्तीचे भव्य दर्शन भारत जोडो यात्रेत दिसेल, असे जयराम रमेश यांनी सांगितले.