scorecardresearch

गडचिरोली: नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके जप्त

भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावानजीक रस्त्याच्या कडेलगत नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके शोधण्यात विशेष अभियान पथकाच्या पोलिसांना यश आले आहे. ‘

High explosives buried by Naxalites seized gadchiroli
'टीसीओसी' च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात धडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव जवानांनी उधळून लावला आहे.

भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावानजीक रस्त्याच्या कडेलगत नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके शोधण्यात विशेष अभियान पथकाच्या पोलिसांना यश आले आहे. ‘टीसीओसी’ च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात धडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव जवानांनी उधळून लावला आहे.

हेही वाचा >>>नागपूर: कॅन्सर रुग्णालयाचा चेंडू आता ‘एनएमआरडीए’च्या ‘कोर्टात’

नेलगुंडा परिसरात प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील नक्षलविरोधी अभियान पथकाचे जवान काल सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना त्यांना जमिनीत स्फोटके आढळून आली. तीन वायर बंडल, बॅटरी, डेटोनेटर इत्यादी साहित्य पोलिसांनी शिताफीने बाहेर काढून बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने ही स्फोटके नष्ट करण्यात आली. यामुळे मोठा घातपात टळला. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 14:20 IST

संबंधित बातम्या