नागपूर : सकाळी लग्नाची वरात निघणार होती…ऐनवळी घाई नको म्हणून  मालकाने नवरदेवासाठी रात्रीच घोडा सजवून ठेवला… सर्व तयारी करुन घोडामालक एकदाचा झोपला…. मात्र, रात्रीतच आक्रित घडले… चिक्कार फिरूनही काहीच हाती न लागलेल्या चोरट्यांना हा सजवेला घोडा दिसला…मालक गाढ झोपेत होता….चोरट्यांनी ही संधी साधली व दोन लाख रुपये किंमतीचा सजवलेला घोडा घेऊन पळ काढला….इकडे वरातीसाठी घोडा येईल म्हणून वाट पाहणाऱ्या नवरदेवाची मात्र मोठीच पंचाईत झाली… अजब चोरीची ही गजब घटना नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संतोष कुमार (६०, रा. आदिवासी सोसायटी, वृंदावन कॉलनी, गिट्टीखदान) यांचा लग्नात घोडे पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे पांढराशुभ्र नुखऱ्या प्रजातीचा घोडा आहे. त्यांनी हा घोडा आपल्या अंगणात बांधून ठेवला होता.

हेही वाचा >>> वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न

Pet dog owner, Dombivli, Samrat Chowk,
डोंबिवलीत सम्राट चौकात पाळीव श्वान मालकाची वडील-मुलाला ठार मारण्याची धमकी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Roads in Nashik under water due to heavy rain
अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात
man gold chain snatched after threatening in mahapalika bhavan area
महापालिका भवन परिसरात तरुणाला धमकावून सोनसाखळी चोरी
pune youth buried after electrocuted
पुणे: जखमी तरूणाला उपचाराऐवजी खड्डयात गाडून पुरण्याचा प्रकार, सिंहगड रस्ता पोलिसांकडून दोघेजण ताब्यात
tungbhadra dam gate broke
देशातील ‘या’ प्रमुख धरणाचा दरवाजा तुटला, पाण्याच्या मोठ्या विसर्गाने सतर्कतेचा इशारा; नक्की काय घडले? शेतकरी का घाबरले?
gangster, murder, Ramtekdi area,
पुणे : दारुसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून गुंडाचा खून, रामटेकडी परिसरातील घटना
gang, vandalized, liquor shop,
पुणे : लष्कर भागात टोळक्याची ‘गटारी’ला मद्याच्या दुकानात तोडफोड

शनिवारी सकाळी एका ठिकाणी लग्न असल्यामुळे घोड्याला रात्री सजविण्यात आले. त्याला खायला घालून संतोष कुमार झोपी गेले. परंतु, अज्ञात आरोपीने शुक्रवारी मध्यरात्री घोडा चोरून नेला. सकाळी उठल्यानंतर संतोष यांनी   तयारी केली आणि नवरदेवाकडील मंडळीचा पत्ता घेऊन तासाभरात पोहचणार असल्याचे कळविले. परंतु, तयारी करून घराबाहेर पडताच  घोडा जागेवर दिसला नाही. त्याचा दोर सुटून तो कुठेतरी बाजूच असेल, असे संतोष यांना वाटले. त्यांनी घोड्याचा शोध घेतला असता घोडा कुठेही आढळला नाही. दुसरीकडे नवरदेव वरातीसाठी तयार झाल्याचा फोन आला. आता संतोष पेचात पडले. घोडा दिसत नाही आणि नवरदेव ताटकळत बसलाय. शेवटी घोडा चोरुन नेल्याच्या निष्कर्षावर संतोष पोहचले. यादरम्यान, नवरदेवाचा एक मित्र घोड्यासाठी संतोष यांच्या घरी पोहचला. संतोष डोक्याला हात लावून बसले होते. त्यांनी घोडा चोरी झाल्याची माहिती नवरदेवाच्या मित्राला सांगितली. त्याने ही माहिती नवरदेवाला दिल्याने लग्न मंडपीसुद्धा गोंधळ उडाला. दुसरीकडे पोलीसही तक्रार बघून हैराण झाले. आता चोरट्याचा शोध घेण्यासह घोड्याचाही शोध घेण्याची वेळ पोलिसांवर आली. गिट्टीखदान ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक शारदा भोपाळे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.  तीन पोलीस कर्मचाऱ्याचे पथक घोड्याच्या शोध घेण्यासाठी रवाना झाले तर घोडामालक नवरदेवाच्या मित्राची समजूत घालत बसला.