नागपूर : युवक आणि युवतीची फेसबुकवरून मैत्री झाली. त्यांचे सूत जुळले. युवकाने लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, नंतर त्याने लग्नास नकार दिला. यामुळे तिने आईवडिलांनी शोधलेल्या युवकासोबत लग्न करण्याचे ठरवले. मात्र, हळदीच्या दिवशीच युवकाने प्रेयसीला फोन केला आणि लग्न न करण्यासाठी धमकी दिली. तिने नकार दिल्याने तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवल्या. त्यामुळे हळदीच्या दिवशीच तरुणीचे लग्न मोडले.

हेही वाचा >>> नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….

why Akshay Kumar wakes up 'two and a half hours' before his wife and kids
“…म्हणून मी पत्नी आणि मुलांच्या ‘अडीच तास’ आधी उठतो”, अक्षय कुमारने सांगितले त्याच्या या खास सवयी मागचे कारण, पाहा
karad city police nabbed a gang of five who were preparing to carry out robbery
सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; एका माजी नगरसेवकाच्या खूनाचाही होता प्लॅन?
Nagpur, murder, mother, daughter,
अनैतिक संबंधाच्या संशयातून आईनेच घेतला मुलीचा जीव
Nagpur, Sexual harassment,
‘तुझे न्यूड फोटो पाठव…’, पिस्तुलाच्या धाकावर ठाणेदाराने…
Yavatmal, Abuse, married woman,
यवतमाळ : पतीच्या प्राध्यापक मित्राकडून विवाहितेवर अत्याचार, पेढ्यात गुंगीचे औषध देऊन…
tichi bhumika, Loksatta, special program,
दिग्गजांच्या नजरेतून ‘ती’च्या भूमिकांचा वेध; ‘लोकसत्ता’च्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
shani dev vakri in kumbha rashi
शनिदेव कुंभ राशीत वक्री होताच ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या, कोणत्या राशींचे नशीब पालटणार?

पीडित तरुणी नेहा (काल्पनिक नाव) ही पाचपावली परिसरात राहते. ती उच्चशिक्षित असून तिची फेसबुकवरून आरोपी शुभम पाटील (२७, रामटेक) याच्याशी ओळख झाली. तो नागपुरात एका कंपनीत नोकरी करतो. नेहा आणि शुभम फोनवरून एकमेकांशी बोलत होते. यादरम्यान, शुभमने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याने वाढदिवस असल्याचे सांगून केक कापण्यासाठी बोलावले. तीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवून आली. त्याने तिला रामटेकमधील मूनलाईट हॉटेलमध्ये नेले. तेथे वाढदिवसाचा केक कापल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने काही दिवसांतच लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने नेहाशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १४ फेब्रुवारीला त्याने नेहाला पुन्हा रामटेकमधील हॉटेलमध्ये नेले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना लपून मोबाईलमध्ये छायाचित्र आणि चित्रफीत काढली. त्यानंतर तो तिला वारंवार अश्लील छायाचित्र आई-वडिलांना पाठविण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवत होता. नेहाने त्याला लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिला.

हेही वाचा >>> नागपूर : वडिलांनी सांगितले जाऊ नको, त्याने ऐकले नाही, अखेर… दगडाने ठेचून…

प्रियकराकडून लग्न तोडण्यासाठी दबाव

प्रियकर शुभमने लग्नास नकार दिल्यानंतर नेहाने आई-वडिलांनी शोधलेल्या युवकासोबत लग्न करण्याचे ठरविले. भावी पतीसोबत तिचा संवाद सुरू झाला. मात्र, पूर्वीचे प्रेमप्रकरण तिने लपवून ठेवले. दोन्हीकडे लग्नाची तयारी झाली. हळदीच्या दिवशी शुभमचा नेहाला फोन आला आणि त्याने लग्न तोडण्यासाठी दबाव टाकला. मात्र, नेहाने लग्न मोडण्यास नकार दिला. त्यामुळे प्रियकराने तिचे सर्व अश्लिल छायाचित्र आणि शारीरिक संबंधाच्या चित्रफिती नवरदेवाच्या मोबाईलवर पाठविल्या.

प्रियकराला अटक

शुभमने पाठविलेले छायाचित्र बघताच नवरदेवाच्या पायाखालची वाळू सरकली. हळदीच्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. त्याने तिला भेटायला बोलावले. तिनेही प्रेमसंबंधाची कबुली दिली. त्यामुळे त्याने २१ एप्रिलला होणारे लग्न मोडले. नेहाने थेट पाचपावली ठाणे गाठले. तिने प्रियकर शुभम पाटील विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी हळदीच्या दिवशीच शुभमवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.