अकोला : दलित समाजाच्या मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून संतप्त वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात पोलीस तपासात उघडकीस आला. दुसऱ्या मुलाच्या मदतीने वडिलांनी मुलाचा गळा आवळून जीव घेतला. घटनेनंतर संपूर्ण कुटुंब बाहेरगावी प्रसार होऊन मुलाला कोणी तरी मारल्याचा बनाव रचला होता. पोलीस तपासात मात्र सत्य समोर आले. संदीप नागोराव गावंडे (२६) असे मृताचे, तर नागोराव कर्णाजी गावंडे असे आरोपी वडिलांचे नाव आहे.

हेही वाचा : ‘या’ भागांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’

Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात नागोराव गावंडे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. संदीपचे गावातील एका अनुसूचित जातीच्या कुटुंबातील मुलीशी प्रेम होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे प्रेम संबंध वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे घरात वाद देखील निर्माण होत होता. दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचे ठरवले. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना कळली. त्यावरून वडील नागोराव व संदीपमध्ये वाद झाला. या दरम्यान वडिलांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या मदतीने घरातच संदीपचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर संदीपचे हातपाय बांधून घराला कुलूप लावून सर्व बाहेरगावी निघून गेले. शुक्रवारी सायंकाळी घरी परतले आणिआपल्या मुलाला कोणीतरी मारले, असा बनाव रचला. पोलिसांच्या तपासात सर्व प्रकार उघडकीसझाला. या प्रकरणी वडील आणि मृतकाचा भाऊ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.