अमरावती : मराठी नववर्षाची गुढीपाडव्याची पहाट वरूड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील मोसंबी, संत्रा उत्पादकांसाठी संक्रांत घेऊन आली. गारपिटीने मोसंबी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका दिला आहे. वरूड तालुक्‍यातील वघाळ, वाडेगाव, लोणी परिसर, वंडली, वडाळा, नांदगाव, गाडेगाव, हातुर्णा तसेच मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्‍यातील शेतशिवारातील संत्री बागांचे तसेच गहू आणि कांदा पिकाचे या गारपिटीने आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.

हेही वाचा : सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार

yavatmal forest marathi news, tipeshwar wildlife sanctuary marathi news
यवतमाळ : अभयारण्यात वाघासोबत सेल्फी घेणे पडले महागात; वनक्षेत्र अधिकारी…
future of the candidates in Amravati will be determined by the concealment of political loyalties
अमरावतीत राजकीय निष्‍ठांचा लपंडाव! प्रमुख पक्षांच्‍या नेत्‍यांची…
amravati, politics, sanjay khodke, navneet rana, ncp, bjp, lok sabha election 2024
अमरावतीत राजकीय वैरत्‍वाचा दुसरा अंक
Ajit Pawar On Navneet Rana
“नवनीत राणा यांच्या विजयासाठी…”; उपमुख्यमंत्री अजित पवार चुकून काय म्हणाले?

काल रात्री दहाच्या दरम्यान या शेतशिवारात विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. आज गुढीपाडव्याच्या पहाटे साडेचार ते साडेपाच दरम्यान बोरा पेक्षा मोठी तर कुठे आवळ्याच्या आकाराएवढी गार पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सद्यस्थितीत मोसंबी व संत्री बागांमध्‍ये आंबीया बहराची फळे मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात मोसंबी व संत्रा बागा बहरल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्‍या होत्‍या. मात्र गारपिटीने शेतकऱ्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहे. या गारपिटीने बागांमधील फळांचे नुकसान झाले आहे. तहसील प्रशासनाला या गारपिटीची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसील प्रशासनाकडे केली आहे. सध्‍या काढणीवर आलेल्‍या गहू आणि कांदा पिकाचे या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.