बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत म्हणजे विद्यमान खासदांरासह लढतीतील प्रमुख उमेदवारांसाठी कठोर अग्निपरीक्षा ठरते आहे. दुसरीकडे, ही लढत आजी, भावी व माजी आमदारांसाठी एक चाचपणी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरत आहे. यामुळे हे सर्व ताकदीने प्रचाराला भिडले आहे.

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. १९९५ ते २००९ दरम्यान मेहकरचे आमदार तर २००९ ते २०१९ दरम्यान खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मात्र, तरीही ही निवडणूक त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरली आहे. यंदाचा विजय त्यांना राजकारणात वेगळ्या उंचीवर नेणारा व दिल्ली दरबारी ‘मोठी संधी’ उपलब्ध करून देणारा ठरणार आहे. मात्र, पराभूत झाले तर त्यांचे राजकारण धोक्यात येणार, हे उघड आहे. त्यांची जागा व शिंदे गट मुठीत करण्यासाठी इतरजण तयारच आहेत. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी पहिल्या लढतीइतकीच निर्णायक ठरते आहे. लढाईत अनेक बाबी त्यांच्यासाठी अनुकूल असल्या तरी निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी काळाची गरज ठरली आहे.

ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
prakash ambedkar pratik patil vishal patil
सांगलीचं गणित बिघडणार? प्रकाश आंबेडकर मैदानात; प्रतीक पाटलांच्या भेटीनंतर मोठं वक्तव्य, म्हणाले, “विशाल पाटील जर…”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं

हेही वाचा…“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचीही हीच स्थिती आहे. विजयाचे दावे करणारे रविकांत तुपकर, संदीप शेळके, वंचितचे वसंत मगर यांच्यासमोर स्वबळावर लढा देत जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांचे कठीण वाटणारे दावे फोल ठरले तर त्यांच्या भावी राजकारणाची वाट बिकट होणार आहे.

आमदारांची ‘लिटमस टेस्ट’

दुसरीकडे, ही निवडणूक सहा विद्यमान, माजी व भावी इच्छुक आमदारांसाठी एक ‘लिटमस टेस्ट’ ठरली आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. जिल्ह्यात सहाही आमदार महायुतीचे आहेत. यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्या समक्ष आहे. तसेच विधानसभेच्या तोंडावर आपली लोकप्रियता कायम आहे का, हे पाहण्याची संधी लोकसभा निवडणुकीने त्यांना उपलब्ध करून दिली आहे. तसेच ही लढत माजी आमदार, मागील लढतीतील पराभूत आणि यंदा लढण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुक नेत्यांची देखील अग्निपरीक्षा आणि भावी लढतीची रंगीततालीम ठरली आहे. त्यामुळे रिंगणात त्यांचा एकच उमेदवार असला तरी न दिसणाऱ्या लढतीत अनेक नेते झुंजत आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….

‘लिड’चे आदेशच?

महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही घटक पक्षांच्या आमदारांना विधानसभा क्षेत्रात कोणत्याही किमतीवर उमेदवाराला मताधिक्य हवेच, असे आदेश देण्यात आले आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांसमोर मोठेच आव्हान आहे.

हेही वाचा…अरे हे काय? वंचित आघाडीचे उमेदवार काँग्रेसमध्ये गेले…

युतीला २०१९ मध्ये मिळालेली मते (विधानसभानिहाय)

सिंदखेडराजा : ५९९२
मेहकर : ६३३५
चिखली : २३८६१
बुलढाणा : २५७९३
जळगाव : ३६९८४
खामगाव : ३३२७९
खामगाव : ३३३७९
पोस्टल : १०४३
मताधिक्य : १३३२८७