गडचिरोली : खून, चकमकी आणि जाळपोळीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र वेलादी(३२) असे अटक करण्यात आलेल्या नक्षल्याचे नाव असून अहेरी तालुक्यातील दामरंचा गावाजवळून त्याला ताब्यात घेण्यात आले. महेंद्र हा छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील चेरपल्ली येथील रहिवासी असून, तो २००९ मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी झाला. सुरुवातीला पुरवठा समिती आणि सध्या नॅशनल पार्क एरियामधील , त्यानंतर सँड्रा दलममध्ये कार्यरत होता. सध्या नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु असून, या सप्ताहात ते हिंसक कारवाया करतात. आज महेंद्र वेलादी हा दामरंचाजवळच्या इंद्रावती नदी परिसरात पोलिसांच्या हालचालींची माहिती देण्याच्या हेतूने फिरत असताना विशेष अभियान पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या ९ क्रमांकाच्या बटालियनच्या जवानांनी त्यास अटक केली. दामरंचा आणि मन्नेराजाराम या दोन्ही ठिकाणच्या पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या हालचालींवर तो पाळत ठेवून होता, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : सरकारने ओबीसीना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलीच नाही; चिमूर क्रांतीभूमीतून गुरुवारपासून साखळी अन्नत्याग आंदोलन

Pregnant Woman, Injured by Falling Stone, Nerul, police register fir, Blasting Work Halted, navi mumbai news, marathi news, blasting for construction site, nerul construction site, construction site, builder construction site, nerul railway station west,
स्फोटप्रकरणी विकासकावर गुन्हा; नेरुळमधील स्फोटांचे काम बंद, नगररचना विभागाची विकासकाला कारणे दाखवा नोटीस
Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता

२०२३ मध्ये कापेवंचा-नैनेर जंगलात वनाधिकाऱ्यांवर हल्ला आणि जाळपोळीच्या घटनेत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२२ मध्ये टेकामेट्टा येथे झालेल्या चकमकीसह सँड्रा येथे २०२३ मध्ये झालेल्या एका नागरिकाच्या हत्येतही तो सहभागी होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ७२ नक्षल्यांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक(अभियान) यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.